टक्केवारीच्या स्पर्धेत संस्कार मागे पडले
By admin | Published: January 10, 2017 11:15 PM2017-01-10T23:15:48+5:302017-01-10T23:15:48+5:30
सदाभाऊ खोत : नवे पारगावच्या वारणा विद्यानिकेतनचे वार्षिक पारितोषिक वितरण
नवे पारगाव : मानवी जीवनात आई-वडिलांचे स्थान यशाच्याही पलीकडचे आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत संस्कार मागे पडत आहेत. विद्यार्थ्यांना आता कागदापलीकडचं ज्ञान देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील वारणा विद्यानिकेतन व आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्स विद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.
खासदार महाडिक यांनी शिक्षण समूहाची प्रशंसा करीत येथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला.
शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष प्रविता सालपे, सरपंच अप्रोज शिगावे, ए. आर. पोतदार, साहित्यिक दि. बा. पाटील, वैभव कांबळे, बाबासाहेब मोरे, प्रदीप देशमुख, संपत पोवार, राजेंद्र माने, कांचन पाटील, वाय. बी. पाटील, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखिल पाटील, आर. डी. पाटील, आकांक्षा देशमुख, अर्चना क्षीरसागर, आदी उपस्थित होते. सचिव अमोलकुमार पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एस. एस. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
नवे पारगाव येथील वारणा विद्यानिकेतनच्या पारितोषिक वितरण समारंभात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ए. बी. पाटील, विश्वेश कोरे, अमोलकुमार पाटील, दि. बा. पाटील, आदी उपस्थित होते.