लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:04+5:302021-08-19T04:29:04+5:30
कागल - कागल-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात कागलच्या श्री ...
कागल
- कागल-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात कागलच्या श्री लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल उभारण्यास आणि कागल शहराजवळ एसटी बसस्थानकाच्या बाजूला असलेला लहान पूल मोठा करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देऊन खर्चाची तरतूद केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत.
समरजित घाटगे यांनी प्रत्यक्ष भेटून या मागण्या केल्या होत्या. त्यानंतर सातत्याने या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या मागणीचा विचार करून या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसे पत्र गडकरी यांच्याकडून समरजित घाटगे यांना पाठविण्यात आले आहे. असे प्रसिद्धीपत्रक घाटगे यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
कोट
लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभा करावा याबाबत मी दोन वर्षे प्रयत्न करीत आहे. या चौकात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वेळा लहान-मोठे अपघात होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत. येथे उड्डाणपूल झाल्यास अपघातांच्या प्रमाणात घट होईल. वाहतूकही सुरळीतपणे सुरू राहील. त्याचबरोबर कागल शहराजवळील पुलालाही मंजुरी मिळाली आहे.
-समरजित घाटगे