नागणवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज देण्यास मंजुरी : आमदार प्रकाश आबिटकर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:02+5:302021-03-13T04:43:02+5:30

आमदार प्रकाश आबिटकर. गारगोटी, भुदरगड तालुक्यातील गेल्या २० वर्षांपासून पुनर्वसन व निधीअभावी रखडलेल्या नागणवाडी (बारवे-दिंडेवाडी) प्रकल्पातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी ...

Sanction to give special financial package to the remaining project affected people of Naganwadi Irrigation Project instead of alternative land: MLA Prakash Abitkar. | नागणवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज देण्यास मंजुरी : आमदार प्रकाश आबिटकर.

नागणवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज देण्यास मंजुरी : आमदार प्रकाश आबिटकर.

Next

आमदार प्रकाश आबिटकर.

गारगोटी,

भुदरगड तालुक्यातील गेल्या २० वर्षांपासून पुनर्वसन व निधीअभावी रखडलेल्या नागणवाडी (बारवे-दिंडेवाडी) प्रकल्पातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज देण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

भुदरगड व कागल तालुक्यातील २५ ते ३० हून अधिक गावांना वरदान ठरणाऱ्या नागणवाडी (बारवे-दिंडेवाडी) प्रकल्पाचे काम लाभक्षेत्रामध्ये जमिनी उपलब्ध नसल्याने व निधीअभावी रखडलेले होते. याकरिता आमदार आबिटकर यांनी शासन स्तरावर वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पास ७२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त करून निधी उपलब्धताही केली आहे. याबरोबरच प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करून हेक्टरी २७ ते ३० लाख रुपये मंजूर करून आणले. यामधील प्रकल्पग्रस्तांना पॅकेजचे वाटपही सुरू आहे. परंतु उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. याकरिता आमदार आबिटकर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून उर्वरित पात्र कुटुंबांना जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामातील प्रमुख अडथळा असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, प्रकल्पासाठी लागणाऱ्या ९५.८६ हे. जमिनीचे संपादन पूर्ण झालेले असून, शासन मान्यतेनुसार पॅकेज वाटपाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. दि. १२ डिसेंबर २०२० अखेर ११३ प्रकल्पग्रस्तांना १६.३४ कोटी रकमेचे विशेष आर्थिक पॅकेज वाटप ६ टप्प्यात करण्यात आलेले आहे. उर्वरित २२.७६ हे. क्षेत्रासाठी ६ कोटी १४ लाख रुपयांच्या वाढीव आर्थिक पॅकेजला मंजुरी मिळालेली आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबरोबर प्रकल्पाचे काम गतीने सुरू करून लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जून २०२१ अखेर प्रकल्पाचे काम घळभरणीसह पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

याकामी दिंडेवाडीचे सरपंच श्रीधर भोईटे, सरपंच योगेश पाटील, शहाजी वारके, सुरेश पाटील, सुभाष देशपांडे, राजू भारमल, अशोक चव्हाण, शिवाजी पाटील, हिंदूराव चव्हाण यांच्यासह सर्व समितीचे प्रमुख कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.

फोटो : आमदार प्रकाश आबिटकर यांचा लावावा

Web Title: Sanction to give special financial package to the remaining project affected people of Naganwadi Irrigation Project instead of alternative land: MLA Prakash Abitkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.