औरवाड पाणवठ्यावर पुन्हा वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:55+5:302021-09-05T04:28:55+5:30

औरवाड (ता. शिरोळ) येथील पाणवठ्यावर नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर पुन्हा बेकायदेशीर वाळू चोरी सुरू आहे. मध्यरात्री शैकडो वाळू तस्करांकडून लाखो ...

Sand theft again at Aurwad watershed | औरवाड पाणवठ्यावर पुन्हा वाळू चोरी

औरवाड पाणवठ्यावर पुन्हा वाळू चोरी

googlenewsNext

औरवाड (ता. शिरोळ) येथील पाणवठ्यावर नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर पुन्हा बेकायदेशीर वाळू चोरी सुरू आहे. मध्यरात्री शैकडो वाळू तस्करांकडून लाखो रुपयांची वाळूची चोरी केली जात आहे. नदीचे पाणी उतरले असल्याने वाळू तस्करी जोरात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी मंडल अधिकारी, तलाठीकडे तक्रार करून देखील याकडे सोयीस्कर का दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

औरवाड पाणवठ्यावरून नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री शेकडो वाळू तस्करांकडून चोरी सुरू आहे. मोटारसायकलवरून पोत्यातून रात्री १२ ते पहाटे सहा वाजेपर्यंत वाळू चोरी केली जाते. यामुळे नदीपात्रात खड्डे पडले असून पात्र रुंद पडून घाटाला धोका आहे. याबाबत औरवाड येथील शेतकरी, ग्रामस्थांनी मंडल अधिकारी व तलाठी याच्याकडे तक्रार केली आहे. तरी देखील कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. मध्यंतरी तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ यांनी पहाटे कारवाई करून वाळूचे डेपो जप्त केले होते. आता पुन्हा वाळू चोरी सुरू झाल्याने कारवाई होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

चौकट - औरवाडमध्ये वाळू तस्करी जोरात

जुलै महिन्यात आलेल्या महारापुरामुळे झालेल्या दुकाने, घरे, शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यात तहसील कार्यालय व्यस्त असल्याचे पाहून वाळू तस्करांनी पुन्हा चोरी सुरू केली आहे. यावर कायमचा पायबंद करणे गरजेचे आहे. अन्यथा शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोरी जातच राहणार.

फोटो ओळ - : औरवाड ता शिरोळ येथे पाणवठ्यावर कृष्णा नदीकाठलगत केलेली वाळू चोरी.

Web Title: Sand theft again at Aurwad watershed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.