संगीता खाडे यांची हकालपट्टी करा

By admin | Published: June 4, 2017 01:26 AM2017-06-04T01:26:54+5:302017-06-04T01:26:54+5:30

श्रीपूजकांची मागणी : अंबाबाई मूर्ती लेपप्रकरणी श्रीपूजकांच्या बदनामीचे षड्यंत्रल्

Sangeeta Khade expelled | संगीता खाडे यांची हकालपट्टी करा

संगीता खाडे यांची हकालपट्टी करा

Next


ोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी अभिषेक बंदपासून आर्द्रता नियंत्रणात आणण्यापर्यंतच्या उपाययोजना श्रीपूजकांनी केल्या आहेत. मात्र, श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, पावित्र्य राखत नाहीत, असे आरोप केले जात आहेत. देवस्थानच्या सदस्या संगीता खाडे यांनी श्रीपूजकांबद्दल बेजबाबदार वक्तव्ये करून समाजात क्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची देवस्थानच्या सदस्यपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या सदस्यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिली.
‘अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग आणि तिची झीज’ या विषयावर गेल्या आठ दिवसांपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी (दि. २) ‘पुरातत्त्व’चे अधिकारी श्रीकांत
मिश्रा यांनी मूर्ती अंतर्गतरीत्या सुस्थितीत असून, पांढगे डाग घालवून झीज रोखण्यासाठी पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल,
असा निर्वाळा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, नगरसेवक अजित ठाणेकर, शिरीष मुनीश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.
ठाणेकर म्हणाले, दानपेटी वगळता देवस्थान आणि श्रीपूजकांमध्ये कोणतेही वाद नाहीत. देवस्थान समितीवर दोन वेळा सदस्य म्हणून गेलेल्या संगीता खाडे यांच्या चुकीच्या वागण्यामुळेच पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी त्यांना बाजूला ठेवले होते. आता त्यांनी हीन शब्दांत श्रीपूजकांची नाहक बदनामी केली आहे. केदार मुनीश्वर म्हणाले, श्रीपूजक, देवस्थान समिती आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अंबाबाई मूर्तीवर २०१५ साली रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली. गेल्या काही दिवसांत श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, आर्द्रतेचे नियम अमलात आणत नाहीत, असे आरोप केले. मात्र, मिश्रा यांच्यामुळेच त्यावर उत्तर मिळाले आहे. मूर्तीची झीज थांबविण्यासाठी श्रीपूजकांनीच १९७० साली व १९९७ साली अभिषेक पूर्णत: बंद केले. मात्र, त्यातील अनेक बाबी देवस्थान समितीच्या अखत्यारीत आहेत. त्या सगळ्यांची तातडीने पूर्तता करणे, फरशा काढणे, आदींसाठी काही कालावधी लागणार आहे. संवर्धन झाल्यापासून काही संस्था, संघटना विवाद निर्माण करीत आहे. हे मंदिर भक्तीचे क्षेत्र आहे, रणक्षेत्र नाही; संघटनेच्या नेत्यांनी चर्चात्मक पवित्रा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सिंग यांना परवानगी साठे यांच्याकडूनच
निवृत्त झालेल्या मनेजर सिंग यांना श्रीपूजकांनी मूर्तीला हात कसा लावू दिला? या प्रश्नावर केदार मुनीश्वर म्हणाले, सिंग खासगी दौऱ्यासाठी जात असताना कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी मी सोबत संवर्धनाचे साहित्य आणले असून, मूर्तीवर थर देऊ का? असे विचारले असता माधव मुनीश्वर यांनी देवस्थानची परवानगी घ्या, असे सांगितले. त्यानंतर सिंग यांनी दोन तास देवस्थानच्या कार्यालयात तत्कालीन सचिव शुभांगी साठे यांच्याशी चर्चा केली आणि साठे यांनीच त्यांना परवानगी दिल्यानंतर आम्ही हे काम करू दिले. तेव्हा आम्हाला ते निवृत्त झाले होते हे माहीत नव्हते. मात्र, त्यांनी ही बाब सदस्यांना व प्रशासनाला का सांगितली नाही, हे आम्हाला माहीत नाही.
नागचिन्हाबाबत सकारात्मकच : नागचिन्ह घडवू नये यासाठी आम्ही कोणावरही दबाव टाकला नव्हता. आम्ही व मूर्ती अभ्यासकांनीही सगळे संदर्भ, छायाचित्रे दिली होती. मॉडेल म्हणून एका कलाकाराने घडविलेली मूर्तीही ते पाहून आले. तरीही त्यांनी नागचिन्ह का घडविले नाही, हे आम्हाला माहीत नाही. त्यानंतर आम्ही नागचिन्हाबाबत समिती घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, प्रशासनाने त्यावर समितीच नेमली नाही.

Web Title: Sangeeta Khade expelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.