सांगली, साताऱ्याची विजयी सलामी
By admin | Published: January 7, 2015 12:47 AM2015-01-07T00:47:07+5:302015-01-07T00:56:03+5:30
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
सांगली : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळप्रकारात सांगली व सातारा संघांनी विजयी सलामी दिली. येत्या गुरुवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एन. जे. पवार यांच्याहस्ते स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन होत आहे. यावेळी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत. सांघिक खेळ प्रकारात हॉकीमध्ये पुरुषांमध्ये सातारा विरुद्ध पुणे व सांगली विरुद्ध सोलापूर शहर यांच्यात लढत होऊन यात सातारा व सांगली संघ विजयी झाले. फुटबॉलमध्ये सातारा विरुद्ध पुणे ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर शहर यांच्यातील लढतीत सातारा व कोल्हापूर संघ विजयी झाले. बॉस्केटबॉलमध्ये सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर विरुद्ध कोल्हापूर संघांमध्ये लढत झाली. यामध्ये सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर संघ विजयी झाले. महिलांमध्ये सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर शहर यांच्यामध्ये लढत होऊन सांगली, कोल्हापूर संघ विजयी झाले.
व्हॉलिबॉलमध्ये पुरुष गटात सातारा विरुद्ध पुणे ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर ग्रामीण संघात झालेल्या लढतीत कोल्हापूर व सातारा संघ विजयी झाले. महिलांमध्ये सातारा विरुद्ध पुणे ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर शहर यांच्यामध्ये लढत होऊन सातारा व कोल्हापूर संघ विजयी झाले.
कबड्डीत पुरुष गटात सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सातारा संघात लढत होऊन सांगली व सातारा संघाने विजयी सलामी दिली. महिला गटात सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व सातारा विरुद्ध सोलापूर शहरमध्ये लढत झाली. यात सांगली व सातारा संघ विजयी झाले.
हॅन्डबॉलमध्येपुरुष गटात सांगली विरुद्ध सातारा व सोलापूर शहर विरुद्ध सोलापूर ग्रामीणमध्ये लढत होऊन सांगली व सोलापूर शहर विजयी झाले. खो-खोत सोलापूर विरुद्ध पुणे ग्रामीण आणि सांगली विरुद्ध कोल्हापूर यांच्यात लढत होऊन पुणे ग्रामीण व सांगली संघ विजयी झाले. महिलांत कोल्हापूर व पुणे ग्रामीण संघ विजयी झाले. (प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या महिला खेळाडूंची आघाडी
तिहेरी उडीत संतोष माळी (सांगली), थाळीफेकमध्ये सचिन जमदाडे (सातारा), पाच हजार मीटर धावणेत किरण बिंदगे (कोल्हापूर), ४०० मीटर धावणेत महिलांत कविता कदम (कोल्हापूर), पाच हजार मीटर धावणे मीनाताई देसाई (कोल्हापूर), थाळीफेकमध्ये स्वप्नाली पवार (पुणे ग्रामीण) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.