सांगलीची मुले, तर सातारच्या मुलांच्या संघाला विजेतेपद
By admin | Published: December 25, 2014 11:09 PM2014-12-25T23:09:01+5:302014-12-26T00:08:42+5:30
विभागीय कबड्डी : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघांची निवड
वाळवा : कोल्हापूर विभागीय (पायका) कबड्डी स्पर्धेत सांगली जिल्हा मुलांचा संघ विजेता ठरला, तर मुलींच्या विभागात सातारा जिल्हा संघ विजेता ठरला. यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचा मुले व मुलींचा अंतिम संघ निवडण्यात आला. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रांतिवीरांगणा लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरीत या स्पर्धा पार पडल्या, तर मुलींच्या स्पर्धा शिवाजी व्यायाम मंडळाच्या क्रीडानगरीत पार पडल्या. मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन वैभव नायकवडी यांनी केले, तर मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले.
मुलांच्या स्पर्धेत सांगली विरुद्ध कोल्हापूर हा अंतिम सामना रंगतदार झाला. यामध्ये सांगली जिल्हा संघ १६ गुणांनी विजेता ठरला, तर रत्नागिरी जिल्हा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
मुलींच्या स्पर्धेत सातारा विरुद्ध सांगली यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये सातारा जिल्हा संघ १९ गुणांनी विजेता ठरला, तर सांगली जिल्हा संघ उपविजेता ठरला.
कोल्हापूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या स्पर्धेत पंच म्हणून अजित भिलवडे, विलास गायकवाड, महेंद्र पवार, गुरू सनगरे यांनी काम पाहिले.
यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कोल्हापूर विभागाचा मुलांचा संघ असा : वीरधवल नायकवडी, हर्षल गायकवाड, मनोज पाटील, किरण घोडके (सर्व सांगली), शुभम पाटील, शुभम माने, केतन पाटील, सूरज पाटील (सर्व कोल्हापूर), प्रथमेश निकम (रत्नागिरी), प्रथमेश मोहिते (सातारा). मुलींचा संघ असा : सोनाली हेळवी, काजल इंगळे, संजुश्री तांबे (सातारा), गौरी निकम, प्राजक्ता ठोंबरे, नम्रता भोसले (सांगली), पूजा हासूरकर, शिवानी चव्हाण (कोल्हापूर), तेजल बिरजे, धनश्री जाधव (रत्नागिरी).
स्पर्धेच्यावेळी सहायक जिल्हा क्रीडाधिकारी शंकर भास्करे, तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर उपस्थित होते. (वार्ताहर)