नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड अन् आज मृत्यू; संग्रामच्या निधनानं गावात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 08:38 PM2022-12-27T20:38:05+5:302022-12-27T20:38:22+5:30

संग्रामला तीन चार दिवसापूर्वी ताप आला होता. त्याच्यावर गावी उपचार सुरू होते.

Sangram Gurav, an unopposed youth gram panchayat member from Sadoli Dumala, died of dengue. | नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड अन् आज मृत्यू; संग्रामच्या निधनानं गावात हळहळ

नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड अन् आज मृत्यू; संग्रामच्या निधनानं गावात हळहळ

Next

- शिवाजी लोंढे

कसबा बीड : सडोली दुमाला (ता.करवीर ) येथील नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झालेल्या संग्राम सीताराम गुरव  (वय २७) या युवकाचे डेंग्यूने आज मंगळवारी मृत्यू झाला. संग्रामची बातमी गावावर शोककळा पसरली. या घटनेने सडोली दुमालासह परिसरात हळहळ व्यक्त होत  आहे.

संग्रामला तीन चार दिवसापूर्वी ताप आला होता. त्याच्यावर गावी उपचार सुरू होते. तपासणी रिपोर्टनुसार  डेंग्यू झाल्याचे कळले. उपचार करूनही प्रकृती नाजूक बनल्याने त्याला काल सोमवारी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  डेंग्यूसह कविळीमुळे प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. उपचाराला शरीराने साथ न दिल्याने संग्रामचे निधन झाले. संग्रामचे निधन झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी  फोडलेला टाहो मन हेलावून टाकणारा होता.

सडोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पाडली. यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांची  बिनविरोध निवड करण्यात आली होती. फक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती. या बिनविरोध सदस्यात प्रभाग क्रं. ३ मधून संग्रामची निवड करण्यात आली होती. मागील  पंचवार्षिक निवडणुकीत तो निवडून आला होता. सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून तो काम पाहणार होता. तत्पूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. 

वारकरी संप्रदायातील संग्राम गावातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा संग्राम असा निघून गेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. त्याला १ वर्षाची मुलगीही आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि.२९) आहे.

Web Title: Sangram Gurav, an unopposed youth gram panchayat member from Sadoli Dumala, died of dengue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.