देवर्डेत सानिया-नुपूरच्या योगा प्रात्यक्षिकांनी शिबिराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:06+5:302021-04-01T04:25:06+5:30
मुख्याध्यापक नामदेव माईनकर व संयोगिता सुतार यांनी सानिया व नुपूर लोखंडे या योगा खेळाडूंसह पालक सुजित लोखंडे यांचे स्वागत ...
मुख्याध्यापक नामदेव माईनकर व संयोगिता सुतार यांनी सानिया व नुपूर लोखंडे या योगा खेळाडूंसह पालक सुजित लोखंडे यांचे स्वागत केले. सुनील सुतार यांनी १४ वर्षांच्या योग शिबिराचा आढावा घेतला.
सानिका व नुपूर यांनी सूर्यनमस्कारासह पूर्णमत्स्येद्रासन, पश्चिमोत्तासन, चक्रासन, टि्वस्टिंग, व्याघ्रासन, शलभासन, हनुमानासन, भूमासन, उथीत पादहस्तासन, हँडस्टँड, शीर्षासन, नर्तकासन, हँडस्टँड ट्विस्टिंग, गंडभिरंडासन, दंडासन, उथीत टिटिभासन या योगासनांची रोमांचक प्रात्यक्षिके करून दाखविली.
तत्पूर्वी प्रथम दररोजचा ओमकार जप व प्राणायाम आणि अन्य योगासने सुनील सुतार यांनी घेतली.
कार्यक्रमास सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके, महादेव तेजम यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------
* फोटो ओळी :
देवर्डे (ता. आजरा) येथील योग शिबिरात शीर्षासन करून दाखविताना सानिया लोखंडे.
क्रमांक : ३१०३२०२१-गड-०१