सानिका, पंकजच्या पंखाला रवीश पाटील-कौलवकरांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:55+5:302021-09-16T04:30:55+5:30

शिवाय अनेकजण या दोन खेळाडूंच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करून या खेळाडूंना मदतीचे आवाहन केले ...

Sanika, the power of Ravish Patil-Kaulavkar to Pankaj's wing | सानिका, पंकजच्या पंखाला रवीश पाटील-कौलवकरांचे बळ

सानिका, पंकजच्या पंखाला रवीश पाटील-कौलवकरांचे बळ

Next

शिवाय अनेकजण या दोन खेळाडूंच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करून या खेळाडूंना मदतीचे आवाहन केले होते. या वृत्ताची दखल घेत अनेक दानशूर लोक पुढे येत आहेत.

राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द येथील सानिका जाधव व पंकज पाटील या दोन गरीब कुटुंबांतील खेळाडूंची श्रीलंकेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या दोघांनी जयपूरमध्ये लख्ख यश मिळविले होते. या दोन्ही खेळाडूंचे तालुक्यातून कौतुक होत आहे. मात्र, आर्थिक मदतीची गरज असल्याचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच रवीश पाटील - कौलवकर व सुशील पाटील - कौलवकर या दोन युवा नेत्यांनी या खेळाडूंची भेट घेत मदत केली.

तालुक्यात अनेक नेते व दानशूर मंडळी आहेत, त्यांनीही मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. अशी दानशूर मंडळी पुढे आली तर या दोन खेळाडूंचे मनोबल नक्कीच वाढेल.

चौकट

‘लोकमत’चे मानले आभार!

या दोन खेळाडूंबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून मदतीचे आवाहन केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच अनेकांनी आवळी खुर्द गाठून खेळाडूंचे कौतुक करून मदत दिली. याबाबत या खेळाडूंसह ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.

Web Title: Sanika, the power of Ravish Patil-Kaulavkar to Pankaj's wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.