मुरगूडच्या क्रिकेट स्पर्धेत सानिका स्पोर्ट्स अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:44+5:302020-12-29T04:24:44+5:30

स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राजू आमते युवा मंच, मुरगूड या संघाने मिळवले. त्यांना पंधरा हजार ६९९ रुपये व चषक ...

Sanika Sports unbeaten in Murgud cricket tournament | मुरगूडच्या क्रिकेट स्पर्धेत सानिका स्पोर्ट्स अजिंक्य

मुरगूडच्या क्रिकेट स्पर्धेत सानिका स्पोर्ट्स अजिंक्य

googlenewsNext

स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राजू आमते युवा मंच, मुरगूड या संघाने मिळवले. त्यांना पंधरा हजार ६९९ रुपये व चषक देऊन संघाच्या गौरव करण्यात आला. या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे दहा हजार ६९९ रुपये व चषक बक्षीस भैया स्पोर्ट्स मुरगूड आणि मयूर स्पोर्ट्स लिंगनूर या दोन संघांना विभागून देण्यात आले. या स्पर्धेतील व्यक्तिगत कामगिरीसाठी फास्टट्रॅक घड्याळ आणि एक हजार रुपये रोख असे बक्षीस देण्यात आले.

अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब निशांत जाधव (सानिका स्पोर्ट्स) यांने पटकावला. स्पर्धेतील ‘बेस्ट बॉलर’ हा किताब साहील मोमीन याने तर ‘मॅन ऑफ दि सिरीज’ हा किताब अनिकेत माने या सानिका स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी मिळविला. सामन्यातील ‘बेस्ट फिल्डर’ किताब राजू आमते युवा मंचच्या संतोष सासवडकर या खेळाडूला देण्यात आले. स्पर्धेचे उद्‌घाटन सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे व सहा पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सुनीलराज सूर्यवंशी, राहुल देसाई, दगडू शेणवी,नगरसेवक रवी परीट,बटू जाधव, संतोष वंडकर,बजरंग सोनूले,नंदकुमार खराडे, प्रशांत मांगोरे, युवराज पाटील, विठ्ठल भुते ,आकाश रेंदाळे उपस्थित होते.

फोटो ओळ :- मुरगूड (ता. कागल) येथील सानिका स्पोर्ट्स फाैंडेशनच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यातील विजयी संघाला बक्षीस देताना सुनीलराज सूर्यवंशी,संतोष वंडकर,बजरंग सोनूले,दगडू शेणवी,सुशांत मांगोरे,बट्टू जाधव आदी

Web Title: Sanika Sports unbeaten in Murgud cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.