संजय घोडावत आयआयटी मेडिकल अकॅडमीचे ‘जेईई मेन्स’मध्ये घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:25 AM2021-03-17T04:25:54+5:302021-03-17T04:25:54+5:30
कोल्हापूर : जेईई, सीईटी, एम्स आणि नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत संजय घोडावत आयआयटी व ...
कोल्हापूर : जेईई, सीईटी, एम्स आणि नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या १९ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स-फेब्रुवारी २०२१ या परीक्षेत ९९ पर्सेन्टाइलहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. राज्यात ९९ पर्सेन्टाइलच्या वरती ४१ विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले असून, त्यापैकी १९ विद्यार्थी हे घोडावत अकॅडमीचे आहेत.
या अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विपुल पाटील (९९.९१ पर्सेन्टाइल), आदित्य देशपांडे (९९.७६) , हर्षवर्धन भोसले (९९.७३), सिद्धार्थ शाह (९९.७२), वेदांत भंडारे (९९.६९), प्रणव मगदूम (९९.६५), सिद्धांत सौदत्ती (९९.६४), कृष्णा बलदवा (९९.५७), केदार चौगुले (९९.५४), माधव कदम (९९.५१), प्रतीक निकम (९९.४८), सुमेध कोले (९९.३८), पलाश जोशी (९९.३६), सिद्धांत मगदूम (९९.३३), ओंकार चव्हाण (९९.३०), प्रतिथ मेहता (९९.१८), संकेत बाबर (९९.१६), अवधूत सावळे (९९.१३), अक्षय मालू (९९.११) यांचा समावेश आहे. घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक श्री. वासूसर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
प्रतिक्रिया
आयुष्यात ध्येय निश्चित करून आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर कोणतेही यश सहज प्राप्त करू शकतो हे या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालावरून दाखवून दिले. राज्यातील ४१ विद्यार्थ्यांपैकी आमच्या अकॅडमीचे १९ विद्यार्थी आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढेही होणाऱ्या जेईई मेन्स, ॲडव्हान्स परीक्षेतही या अकॅडमीचे विद्यार्थी चमकतील.
- संचालक श्री. वासूसर
फोटो (१६०३२०२१-कोल-आयआयटी न्यूज फोटो)
फोटो (१६०३२०२१-कोल-वासू सर आयआयटी न्यूज फोटो)