संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना "आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी इन एज्युकेशन" हा पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:41+5:302021-09-06T04:28:41+5:30
कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना नवभारत मीडियाकडून '' ऑऊटस्टँडिंग ‘पर्सनॅलिटी इन एज्युकेशन’ हा पुरस्कार प्रदान ...
कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना नवभारत मीडियाकडून '' ऑऊटस्टँडिंग ‘पर्सनॅलिटी इन एज्युकेशन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथे झाले. विनायक भोसले यांनी स्वतः हा पुरस्कार स्वीकारला.
भोसले यांनी विश्वस्त म्हणून १२ वर्षांच्या कालावधीत तत्पर, जबाबदार, स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासक म्हणून ठसा उमटविला आहे. २०१० पासून त्यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा कार्यभार स्वीकारला. घोडावत इन्स्टिट्यूट ते घोडावत विद्यापीठ या प्रवासात विश्वस्त म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले.
भोसले यांना २०१५ साली आविष्कार फौंडेशनतर्फे ''उत्कृष्ट प्रशासक'' म्हणून गौरविण्यात आले. २०१७ साली सी न्यूजतर्फे शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ''उत्कृष्ट कार्यगौरव'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१८ साली संजय घोडावत ग्रुपतर्फे त्यांना ''एज्युकेशन एक्सलन्स'' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. २०१९ साली महाराष्ट्र पत्रकार संघाकडून '' राज्यस्तरीय नवरत्न'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
घोडावत विद्यापीठाची अल्पावधीतच झालेली नेत्रदीपक प्रगती, तसेच इन्स्टिट्यूटला नॅक कडून 'अ' हा दर्जा, एन. बी. ए. मानांकन, आय. एस. ओ. मानांकन व विविध पुरस्कार मिळण्यामागे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे.
पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. एन. के. पाटील यांनी अभिनंदन केले.
फोटो क्रमांक - ०५०९२०२१-कोल-घोडावत विद्यापीठ
ओळ - संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना नवभारत मीडियातर्फे ''आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी इन एज्युकेशन'' पुरस्कार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.