वाकरेतील पौराणिक तलावाला संजय मंडलिक यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:16+5:302021-05-14T04:24:16+5:30
कोपार्डे : कोरोनाचा काळ आल्याने पंतप्रधानांनी खासदारांचा निधी गोठवला आहे; पण कोल्हापूर जिल्ह्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असल्याने या ...
कोपार्डे : कोरोनाचा काळ आल्याने पंतप्रधानांनी खासदारांचा निधी गोठवला आहे; पण कोल्हापूर जिल्ह्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असल्याने या कालखंडातील पाऊलखुणा असणाऱ्या अशा वास्तू व वस्तूंंचे जतन करण्याची जबाबदारी सरकारची असली तरी लोकप्रतिनिधींनी याला अग्रक्रम देणे गरजेचे आहे. शासकीय योजनांमधून मोठा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाकरे (ता. करवीर) येथील सौरऊर्जा प्रकल्पासाठी उत्खनन करत असताना पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या तलावाचा शोध लागला आहे. जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा या तलावाकडे लागल्या आहेत. आज खा. संजय मंडलिक यांनी या तलावाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली व सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.
यावेळी कुंभीचे संचालक संजय पाटील, सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच शारदा पाटील, सदस्य कुंडलिक पाटील, विजय पोवार, महादेव पाटील, सुमन पाटील, अनिता गुरव, प्रा. संजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी आभार मानले.
१३ वाकरे संजय मंडलिक
फोटो
वाकरे, ता. करवीर येथील पौराणिक तलावाला खा. संजय मंडलिक यांनी भेट दिली.