कोल्हापूरकरांनी दिलेले सन्मानपत्र प्रेरणादायी : संजय मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:36 PM2018-08-02T12:36:18+5:302018-08-02T12:47:23+5:30
कोल्हापुरात काम करताना कोल्हापूरवासीयांचे अलोट प्रेम मिळाले. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने दिले गेलेले सन्मानपत्र हे मला प्रोत्साहित करणारे आहे, असे प्रतिपादन मावळते जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी केले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा देशात वेगळेपण जपणारा जिल्हा आहे. कोल्हापूरकरांच्या माणुसकीचा प्रत्यक्ष आणि कोल्हापुरी बाणा यातून खूप काही शिकण्यासारखे असते.
कोल्हापुरात काम करताना कोल्हापूरवासीयांचे अलोट प्रेम मिळाले. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने दिले गेलेले सन्मानपत्र हे मला प्रोत्साहित करणारे आहे, असे प्रतिपादन मावळते जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी केले. बी वॉर्ड निवारण कृती समितीच्या वतीने मोहिते यांना सन्मानपत्र देऊन निरोप देण्यात आला.
मोहिते यांची नुकतीच पदोन्नतीवर नाशिक येथे बदली झाली. त्यांनी शिवाजी पुलाला पर्यायी असणाऱ्या पुलाच्या बांधकामास गती दिली. याबद्दल बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने मोहिते यांना समितीचे किसन कल्याणकर आणि रामेश्वर पतकी यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांची उपस्थिती होती.
संयोजन चिन्मय सासने, फत्तेसिंह सावंत, प्रा. मधुकर पाटील यांनी केले. श्रीधर कुलकर्णी, योगेश शेटे, सतीश गरड, अंकुश देशपांडे, राहुल चौधरी, गुरुदत्त म्हाडगुत, सुमित खानविलकर, शशिकांत गुळवणी, अभिजित पोतदार, राजेश कदम, युवराज पाटील, प्रशांत बरगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि सदस्य, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.