‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका-संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:10 PM2022-05-28T14:10:04+5:302022-05-28T14:31:58+5:30
त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला.
कोल्हापूर : छत्रपतींच्या गादीबद्दल प्रेम आहे आणि राहिल. परंतू राज्यसभेबाबतचा विषय संपला असल्याचे खासदार संजय राऊतांनी आज, कोल्हापुरात स्पष्ट केले. यावेळी शिवसेना हा छत्रपती घराण्याला आदर देत नसल्याचा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला असता, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या एकट्याच्या मालकीचे नाहीत. ते संपुर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत हे लक्षात घ्या असेही ते म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केल्याची टीका केली होती याबाबत राऊतांना सवाल करण्यात आला. यावर राऊतांनी ते अपक्ष आहेत का? असा सवाल केला. त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला.
चंद्रकांत पाटील छत्रपतींचे वंशज आहेत का?
शरद पवार आणि ठाकरे यांच्यावर रोज टीका करणाऱ्यांची मन शुध्द नाहीत. ही एक विकृती आहे. त्यात त्यांना काय आनंद मिळतो कोणास ठाऊक असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबाबत विचारल्यानंतर ते छत्रपतींचे वंशज आहेत का अशी विचारणा राऊतांनी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुढची २५ वर्षे उध्दव ठाकरेंच मुख्यमंत्री
आज सरकारला अडीच वर्षे झाली. आम्ही अडीच घर चाललो, पुढचीही अडीच चालणार. पुढची २५ वर्षे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुढच्या सर्व निवडणुकांसाठी शिवसैनिकांना तयार रहा हा संदेश देण्यासाठी ही मोहिम आहे.
मलिक यांचे अभिनंदन
नबाब मलिक यांनी आयर्न ड्रग्ज प्रकरण लावून धरले आणि भाजपचा बुरखा फाडला. याबद्दल मी मलिक यांचे अभिनंदन करतो. राजकीय दबावाखाली ज्या पध्दतीने एजन्सी हे सर्व सूडबुध्दीने चालले आहे. एक अधिकारी युवकाचं करिअर उध्वस्त करतो. आता हे केंद्र सरकारला दिसत नाही असा असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.