संजय राऊत यांची सभा कर्नाटकी प्रशासनाला खटकली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:09+5:302021-04-19T04:22:09+5:30
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत हे बेळगावमध्ये ...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत हे बेळगावमध्ये आले होते. यावेळी १४ एप्रिल रोजी संयुक्त महाराष्ट्र चौकात भव्य अशी सभाही पार पडली. सभेच्या सुरुवातीपासूनच पोलिसांनी अनेक कारणे सांगून सभेला आडकाठी केली; परंतु रीतसर परवानगीची कागदपत्रे दाखविल्यानंतर पोलिसांची बोलती बंद झाली; पण इतकेच करून शांत बसतील, ते कर्नाटकी पोलीस कसले? या सभेत आता कोविड नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे कारण पुढे करीत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या सभेत नियम पाळण्यात न आल्याने त्यांनी १००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत व खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या सभेवर दंडात्मक कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या या सभेला परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी तक्रार काहींनी महापालिकेकडे केली होती. त्यामुळे महापालिकेकडून मोठी कारवाई केली जाणार होती.