आष्टा येथील संजीव माने ‘कृषिरत्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:43+5:302021-04-01T04:26:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आष्टा (जि. सांगली) येथील संजीव गणपतराव माने यांना राज्य शासनाचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आष्टा (जि. सांगली) येथील संजीव गणपतराव माने यांना राज्य शासनाचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न’ पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत क्रांतिसिंह संपतराव पवार-पवार (रा. सडोली खालसा, ता. करवीर) यांना पुरस्कार जाहीर झाला. शासनाने २०१८ व २०१९ मधील विविध १३४ कृषी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारांचे वितरण नंतर करण्यात येणार आहे. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार विजेत्यांची नावे निश्चित केली. राज्यस्तरीय पीक स्पर्धेत मात्र कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत.
विजेते शेतकरी असे :
२०१८ : वसंतराव नाईक कृषिभूषण व शेतीमित्र पुरस्कार : रवी अशोक पाटील (अंकलखोप, जि. सांगली), जनार्दन संतराम आडसूळ (रा. तरडगाव, ता. फलटण), आप्पासाहेब पांडुरंग पाटील (रा. सागाव, ता. कागल), डॉ. प्रदीप चिंतामण सूर्यवंशी (रा. वारणानगर, ता. पन्हाळा).
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) : अशोक गजानन चिवटे (रा. किन्हई, ता. कोरेगाव).
उद्यान पंडित : शेखर शिवाजीराव विचारे (रा. वरवेली, ता. गुहागर), काकासाहेब रावसाहेब सावंत (रा. अंत्राळ, ता. जत)
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण गट) : धोंडिराम खानगोंडा कतगर (रा. सुळकूड, ता. कागल), दिलीप धोंडिराम चौगुले (रा. हरपवडे, ता. पन्हाळा), मिलिंद दिनकर वैद्य (रा. रिळ, ता. रत्नागिरी).
राज्यस्तरीय पीक स्पर्धा
सोयाबीन : साताप्पा यशवंत पाटील (रा. येळवडे, ता. राधानगरी), मलगोंडा सातगोंडा टेळे (रा. म्हसवे, ता. भुदरगड. देवेंद्र हनमंत यादव (रा. करंजी-परळी, जि. सातारा).
भात : बाळगोंडा बाबगोंडा पाटील (रा. किणी, ता. हातकणंगले), रवींद्र वसंत पाटील (रा. पाडळी, ता. हातकणंगले), क्रांतिसिंह संपतराव पवार-पवार (रा. सडोली खालसा, ता. करवीर)
२०१९ : वसंतराव नाईक कृषिभूषण : जनार्दन जोती काटकर (रा. वडजळ, ता. माण), सुनील आनंदराव माने (रा. आष्टा ता. वाळवा).
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) : सचिन तानाजी येवले (रा. पडवळवाडी, ता. वाळवा).
शेतीमित्र पुरस्कार : पत्रकार राजकुमार बापूसाहेब चौगले (रा. दानोळी, ता. शिरोळ).
उद्यानपंडित : रामकृष्ण ज्ञानदेव वरुडे (रा. निमसोड, ता. खटाव).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार- सर्वसाधारण : महादेव हिंदुराव पाटील, (रा. जाफळे, ता. पन्हाळा). प्रशांत श्रीधर लटपटे (रा. सावळवाडी, ता. मिरज), धनंजय भिकू चव्हाण (रा. म्हसवे, ता. सातारा). शिवप्रसाद काशिनाथ देसाई (रा. बांदा, ता. सावंतवाडी).
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न - कर्मचारी संवर्ग : दिलीप गोविंद दळवी - पर्यवेक्षक.
राज्यस्तरीय पीक स्पर्धा भात- बाबूराव आप्पाजी परिट व मलगोंडा सातगोंडा टेळे (दोघेही रा. सुळकूड, ता. कागल). लक्ष्मण अनंत वराडकर (रा. केळूस, ता. वेंगुर्ला).
सोयाबीन : शहाजी रंगराव पाटील, सुशिला अरुण कुंभार व अनिता मच्छिंद्र कुंभार (तिघेही रा. तासगाव ता. हातकणंगले).