संकेश्वर परिसर बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:06+5:302021-06-29T04:17:06+5:30
संकेश्वर : शहरातील सरकारी रूग्णालयात नागरिकांना एप्रिलपासून कोरोना लस दिली जात आहे. मात्र, दुसरा डोस ८४ दिवसानंतर मिळणार आहे. ...
संकेश्वर : शहरातील सरकारी रूग्णालयात नागरिकांना एप्रिलपासून कोरोना लस दिली जात आहे. मात्र, दुसरा डोस ८४ दिवसानंतर मिळणार आहे.
लसीकरणासाठी नागरिकांनी गाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, केंद्रातील संगणकात नोंद केला आहे. परिणामी पहिला डोस दिल्यानंतर ८४ दिवसानंतर ही मोबाईलवर संदेश न आल्याने नागरिकांना संदेशाची आतुरता लागली आहे.
-------------------------
२) संकेश्वरात भवानी मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ
संकेश्वर : शहरातील गांधी चौक येथील शांत वाड्यात भवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. मंदिराच्या शिखर बांधकामाचा प्रारंभ शंकराचार्य पीठाधिपती श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामीजींच्या हस्ते झाले. शतकापूर्वी निपाणीकर सरकारनी देवीची अष्टभूजा मूर्ती बाराखडी शांतवाड्यात प्रतिष्ठापना केल्याचा इतिहास आहे.
------------------------------------
३) संकेश्वर आगारातर्फे तीन आंतरराज्य बसफेरी सुरू
संकेश्वर : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली कर्नाटकातील बससेवा संकेश्वर आगाराने सोमवार (२८) पासून सुरू केली आहे. संकेश्वर आगाराने हलकर्णी, पुणे, सातारा मार्गावर ३ आंतरराज्य बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. तथापि, आगारासाठी जास्त उत्पन्न देणारा ‘गडहिंग्लज-संकेश्वर’ बसफेरी मात्र बंद असून केवळ महाराष्ट्राची सीमा असणाऱ्या हिटणी नाक्यापर्यंत ही बससेवा सुरू आहे. आगारात ११४ पैकी ५३ बसेस मार्गावर धावत आहेत.
--------------------------
४) संकेश्वरात १४९ जोडपी रीतसर परवानगीने विवाहबद्ध
संकेश्वर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे निर्बंध पाळत गेल्या तीन महिन्यात हुक्केरी तालुक्यात तहसील कार्यालयातून रीतसर परवाना घेऊन १४९ जोडपी विवाहबद्ध झाली. एप्रिल व मे मध्ये ११० तर २८ जूनपर्यंत ३९ जण परवान्यासाठी अर्ज केला होता.