संकेश्वर परिसर बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:42+5:302021-08-17T04:30:42+5:30

दुर्मीळ फोटोचे अनावरण : संकेश्वर येथील शंकराचार्य संस्थान मठात १०० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘धर्म सिंधू’ या पुस्तकाचे अनावरण मठाधिपती ...

Sankeshwar Premises News | संकेश्वर परिसर बातम्या

संकेश्वर परिसर बातम्या

Next

दुर्मीळ फोटोचे अनावरण : संकेश्वर येथील शंकराचार्य संस्थान मठात १०० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘धर्म सिंधू’ या पुस्तकाचे अनावरण मठाधिपती सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामीजींच्या हस्ते झाले. यावेळी पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री, श्रीकृष्ण स्वामी, राजशेखर शास्त्री, पंचागकर्ते गौरव देशपांडे, वामन पुराणिक, गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

क्रमांक : १६०८२०२१-गड-१२

--------------------------

२) विद्या स्वामी यांना पीएच.डी

संकेश्वर : येथील अन्नपूर्णा एम. बी. ए. महाविद्यालयातील प्रा. विद्या शिवानंद स्वामी यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी ‘ए स्टडी ऑफ मॅनेजमेंट प्रॅक्टिस इन फौंड्री इंडस्ट्रीज कोल्हापूर’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. ए. एम. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

- विद्या स्वामी : १६०८२०२१-गड-१३

-------------------------

३) संकेश्वरात दूध वितरकांचा सत्कार

संकेश्वर : येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुडशी यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून दररोज दूध वितरण करणाऱ्या दूध वितरकांचा सत्कार केला. यावेळी प्रभाकर पाटील, प्रवीण म्हेतर, ओंकार मगदूम, भरत पुंडे, शिवानंद नाईक, उमेश सावंत यांचा सत्कार झाला. यावेळी बबलू मुडशी, प्रदीप माणगावी आदी उपस्थित होते.

-----------------------

-

४) संकेश्वरात रस्ता काँक्रिटीकरणास प्रारंभ

संकेश्वर : शहरातील जुन्या पीबी रोडचे नव्याने रुंदीकरण व काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ नगराध्यक्षा सीमा हतनुरे यांच्या हस्ते झाला. माजी खासदार रमेश कत्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.

कत्ती यांच्या प्रयत्नाने ४३५ मीटरच्या या रस्त्यासाठी ४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची रुंदी २३ मीटर होणार असून मध्यभागी १ मीटरचा दुभाजक व दुभाजकापासून दोन्ही बाजूस समान ९ मीटरचा रस्ता असणार आहे.

Web Title: Sankeshwar Premises News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.