संत गाडगेबाबा यांचे कार्य प्रेरणादायी - सविता भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:03+5:302021-02-24T04:27:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संत गाडगे महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन दर शुक्रवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संत गाडगे महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन दर शुक्रवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे श्रमदान म्हणजे गाडगे महाराजांना कृतीतून केलेले अभिवादन आहे, असे गौरवोद्गार जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी काढले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास कामगार न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मैंदर्गी, संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार मैमुन्नीसा सनदे, उपलेखापाल मदन घुगे, माहिती सहायक एकनाथ पोवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. यावेळी मैंदर्गी यांनी सर्वांनीच आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. स्वच्छतेबरोबरच या इमारतीमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय यांसारख्या सुविधाही कराव्यात, अशी सूचना केली.
---
फोटो नं २३०२२०२१-कोल-गाडगे महाराज जयंती
ओळ : कोल्हापुरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मंगळवारी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सविता भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशांत सातपुते, पंकज मैंदर्गी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--