संतोष बागडी धावले मलकापूरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:48+5:302021-03-19T04:21:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘वर्ल्ड रनिंग चॅलेंज इंडिया’मार्फत आयोजित केलेल्या ४२ किलोमीटर मॅरेथाॅन स्पर्धा कोल्हापुरातील आर्यनमॅन डाॅ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘वर्ल्ड रनिंग चॅलेंज इंडिया’मार्फत आयोजित केलेल्या ४२ किलोमीटर मॅरेथाॅन स्पर्धा कोल्हापुरातील आर्यनमॅन डाॅ. संतोष बागडी यांनी ४ तास ४४ मिनिटांत पूर्ण केली.
‘वर्ल्ड रनिंग चॅलेंज’ ही मूळची ऑस्ट्रेलियातील संस्था असून, तिच्या भारतातील शाखेतर्फे रविवारी (दि.१४) ही स्पर्धा घेतली. कोणत्याही भागातून धावले तरी ४२ किलोमीटर अंतर ग्राह्य धरले जाणार होते. डाॅ. बागडी यांनी शिवाजी पुलापासून सुरुवात करीत ४ तास ४४ मिनिटांत मलकापूर गाठत ही स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी आणखी २३ किलोमीटर आंबा येथपर्यंत धाव घेतली. ही त्यांची खारदुर्गला चॅलेंज या स्पर्धेची तयारी होती. सध्या ते रोज १० किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांच्यासोबत संदीप शेळके, विनायक हिरेमठ, संतोष ओतारी, श्याम सितप, संदीप मिरजकर, डाॅ. सुधीर गिरी, सागर बेलेकर, श्रीनिवास सबनीस, अनुप पटेल, इरफान मुल्लाणी, जय पटेल, देविका कुलकर्णी, चिन्मय जोशी, नीलेश जाधव, पद्मसिंह पाटील, उमेश पोवार, शैलेश बोरशेट्टी, शिरीष साबणे यांनी २१ किलोमीटरची धाव घेतली. या सर्वांना आश्विन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : १८०३२०२१-कोल-संदेश बागडी०२