सराईत घरफोड्या नागरगोजेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 04:39 PM2017-08-31T16:39:49+5:302017-08-31T16:44:01+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक संशयितरित्या फिरत असताना रेकॉर्डवरील (अभिलेख) सराईत घरफोड्या राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजविर सुभाष देसाई (वय , २९ रा. सावंत गल्ली, उचगांव,ता. करवीर मूळ राहणार एकतानगर निपाणी जि.बेळगांव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गस्त घालत असताना सापळा रचून गुरुवारी पकडले. त्याच्याकडून चार घरफोडीच्या गुन्ह्यातील ४६७ ग्रॅमचे सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्यावर लक्ष ठेवण्याचे सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण दिल्या.त्यामुळे शाखेने चार विविध तपास पथके तयार केली. त्यानुसार ही पथके गस्त घालत असताना संशयित राजू नागरगोजे हा मध्यवर्ती बसस्थानक फिरत असल्याचे त्यांना दिसले.त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या कब्जात सोन्याचा लप्पा, सोन्याची चेन, सोन्याच्या लहान अंगठ्या असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा एकूण चार ठिकाणी घरफोड्या केल्याचे नागरगोजे याने सांगितले.
त्याच्याकडून या घरफोडीतील सोन्याचे दागिने जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, प्रवीण चौगुले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक अमोल माळी, राजेंद्र सानप, युवराज आठरे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.