सारंग अकोलकरच मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 12:45 AM2016-06-15T00:45:43+5:302016-06-15T00:46:07+5:30

‘सीबीआय’ला संशय : अकोलकर, तावडे यांच्या ई-मेलमध्ये सातजणांचा उल्लेख

Sarang Akolkar killed the killer | सारंग अकोलकरच मारेकरी

सारंग अकोलकरच मारेकरी

googlenewsNext

पुणे/ कोल्हापूर/ मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सारंग अकोलकर आणि त्याच्या एका सहकाऱ्यानेच गोळ्या झाडल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. त्यापार्श्वभूमीवर सीबीआयचे अधिकारी दाभोलकर हत्या प्रकरणाचा सूत्रधार डॉ. वीरेंद्र तावडे याच्याकडून सखोल माहिती घेत आहेत. सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्यात झालेल्या ई-मेलमध्ये सातजणांचा उल्लेख असून, त्यांचाही शोध घेण्यात येत आहे़
मडगाव बॉम्बस्फोटानंतर अकोलकर हा फरारी असून, त्याचा शोध एनआयएपासून सर्व एजन्सी घेत आहेत़ दरम्यान, तावडे हा सीबीआयला तपासासाठी मदत करीत नसल्याने त्याची न्यायालयाच्या परवानगीने बे्रनमॅपिंग आणि पॉलिग्रॉफ टेस्ट घेण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.
ओंकारेश्वर मंदिराजवळ २० आॅगस्ट २०१३ रोजी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर जवळपास पावणेतीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने पहिली अटक केली. अकोलकर आणि तावडे यांच्यामध्ये २०० हून अधिक
ई-मेलची देवाण-घेवाण झाली होती. यापार्श्वभूमीवर आणि तपास यंत्रणांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सारंग अकोलकरच असावा, असा दाट संशय सीबीआयला आहे.
दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार तावडे असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून स्पष्ट झाले आहे़ अकोलकरबाबत सीबीआयला माहिती देण्यास तावडे टाळाटाळ करीत आहे. या हत्याकाडांमागे आणखी काही जण असण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Sarang Akolkar killed the killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.