Navratri 2023: सातव्या माळेला जोतिबाची सरदारी बैठी पुजा, जागरामुळे आज मंदिर रात्रभर खुले राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:04 PM2023-10-21T12:04:38+5:302023-10-21T12:06:28+5:30
जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवताचा जागर होत नाही
दीपक जाधव
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला आज, शनिवारी जोतिबाची सरदारी बैठी पुजा बांधण्यात आली. श्री जोतीबाचा आज जागर असल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. जोतिबाच्या जागर सोहळ्याला एक पारंपारिक महत्व आहे. जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवताचा जागर होत नाही.
जोतिबाची आजची सरदारी बैठी पुजा पुजारी बाळकृष्ण सागळे, अंकुश दादर्णे व समस्त दहा गावकर यांनी बांधली. आज जागरानिमित्या महाराष्ट्रासह कर्नाटक मधून भाविक दर्शनासाठी येतात. सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांची डोंगरावर गर्दी केली आहे. दरम्यान सकाळी १० वाजता मंदीर परिसरात मानाचा उंट, घोडा, देवसेवक यांच्या उपस्थितीत धुपारती सोहळा पार पडला.