सर्जेराव पाटील यांचा सभापती पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 07:06 PM2017-09-26T19:06:56+5:302017-09-26T19:09:43+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिंबधकांकडे दिला. नेत्यांनी दिलेली वर्षाची मुदत संपल्याने पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिंबधकांकडे दिला. नेत्यांनी दिलेली वर्षाची मुदत संपल्याने पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
बाजार समितीच्या निवडणूकीनंतर राष्टÑवादी-जनसुराज्य, मित्र पक्षांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार पाच वर्षात पाच सभापती व उपसभापती केले जाणार आहेत. पहिल्या वर्षी जनसुराज्य पक्षाचे परशराम खुडे यांना तर दुसºया वर्षी राष्टÑवादी कॉँग्रेसचे सर्जेराव पाटील यांना संधी दिली.
पाटील यांचा वर्षाचा कालावधी १९ सप्टेंबरला संपल्याने गेले पंधरा दिवस सभापती बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. सभापती पाटील यांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्याकडे राजीनामा सादर केला.
तिसºया वर्षी सभापतीपदाची राष्टÑवादी कॉँग्रेसला संधी मिळणार आहे. त्यामुळे कृष्णात पाटील (कागल) यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. राजीनामा मंजूरीनंतर नवीन निवडीची प्रक्रिया राबवली जाणार असून दिवाळीच्या अगोदरच नवीन सभापती फटाके फोडण्याची शक्यता आहे.
नेत्यांना घेऊनच राजीनामा!
आतापर्यंत सभापती एकटेच येऊन राजीनामा देत होते, पण सर्जेराव पाटील यांनी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना घेऊनच राजीनामा दिला. ‘बिद्री’च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते.
बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांनी राजीनामा दिला असून आज, बुधवारी मंजूरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविला जाईल.
- अरूण काकडे, जिल्हा उपनिबंधक