सरनोबत चषक ‘पाटणे’कडे

By admin | Published: January 5, 2015 12:30 AM2015-01-05T00:30:14+5:302015-01-05T00:42:24+5:30

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : राजवर्धन पाटील मालिकावीर

Sarnobat Cup 'Patna' | सरनोबत चषक ‘पाटणे’कडे

सरनोबत चषक ‘पाटणे’कडे

Next

कोल्हापूर : तवनाप्पा पाटणे हायस्कूलने सेंट झेविअर्स स्कूल संघाचा पाच गडी राखून पराभव करीत तात्यासाहेब सरनोबत स्मृतिचषक आंतरशालेय सतरा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सामनावीर व मालिकावीर म्हणून पाटणे हायस्कूलच्या राजवर्धन पाटील यास गौरविण्यात आले.
आज, रविवारी शाहू स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट झेविअर्स संघाने २७.४ षटकांत सर्वबाद १२० धावांचे आव्हान पाटणे हायस्कूल संघासमोर ठेवले. त्यामध्ये प्रथमेश बाजरीने २९, अमर हर्चिकरने २८, अर्जुन देशमुखने १८, स्मित पाटील १३, ऋतुराज खानविलकर ७ धावा केल्या. पाटणे हायस्कूलकडून राजवर्धन पाटीलने चार, तर त्यास अनिकेत नलवडे व व्यंकटेश आंबले यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मोलाची साथ दिली.
उत्तरादाखल फलंदाजी करताना पाटणे हायस्कूलने हे आव्हान २७ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा करीत सहजरीत्या पार पाडत विजयावर शिक्कामोर्तब केला. विजयी खेळीत राजवर्धन पाटीलने ४०, श्रीनाथ आंबणेने नाबाद २१, यशवर्धन पाटीलने २७ व अनिकेत नलवडेने १५ धावा केल्या. झेविअर्स संघाकडून अभिषेक सिंगने २, तर प्रथमेश बाजरी, वीरेनसिंग रजपूत, अमर हर्चिकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या हस्ते झाला.
यावेळी केएसए मानद सचिव माणिक मंडलिक, सरदार मोमीन, मानद क्रिकेट सचिव नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, संभाजीराव मांगोरे-पाटील, विश्वंभर मालेकर-कांबळे, नील पंडित-बावडेकर, मनोज जाधव, मधू बामणे



उत्कृष्ट खेळाडू
फलंदाज : यशवर्धन पाटील (पाटणे हायस्कूल),
गोलंदाज : प्रथमेश बाजरी (झेविअर्स हायस्कूल),
सामनावीर व मालिकावीर : राजवर्धन पाटील (पाटणे हायस्कूल)

Web Title: Sarnobat Cup 'Patna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.