सरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 11:00 AM2021-01-08T11:00:21+5:302021-01-08T11:02:57+5:30

Shivaji University Kolhapur- लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याकामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपली हयात वेचली. त्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधी होत्या. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.

Sarojini Babar: Publication of a book on work, research and writing at the university | सरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात सरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन या पुस्तकाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. राजन गवस, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, संतोष सुतार, डॉ. प्रकाश पवार, डॉ. वैशाली भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनसरोजिनी बाबर यांच्या कार्याविषयी पुस्तक प्रकाशन महत्त्वाची बाब : राजन गवस

 कोल्हापूर : लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याकामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपली हयात वेचली. त्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधी होत्या. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. वैशाली भोसले यांनी संपादित केलेल्या सरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन या पुस्तक प्रकाशनप्रसंगी शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. गवस म्हणाले, सरोजिनी बाबर यांनी समाजात प्रचलित असणारी अनेक गीते, त्यातील लोकज्ञान वेचण्यासाठी संकलित करण्यासाठी आयुष्यभर संशोधन कार्य केले. त्यापुढे जाऊन बुरसटलेल्या समाजाला जागृत करीत राहण्याचे काम केले. जीवनात अनेकविध जबाबदाऱ्या पेलत असताना सातत्याने त्या बहुजन समाजाच्या सांस्कृतिक प्रतिनिधी होत्या.

या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने चर्चासत्रे आयोजित केली. हे पुस्तकही साकारले, ही समाधानाची बाब आहे. यापुढील काळातही अशाच दर्जेदार ग्रंथनिर्मितीसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गोरगरीब, शेतकऱ्यांविषयी प्रचंड कळकळ व आस्था बाळगून त्यांच्यासाठी, त्यांच्यामधीलच लोकसाहित्याचे कण वेचून सरोजिनी बाबर यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या योगदानाची अतिशय उत्तम दखल या पुस्तकात घेण्यात आली आहे.

प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील , कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर मृणालिनी जगताप यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नितीन माळी, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे , किरण गुरव, आदी उपस्थित होते.
 

Web Title: Sarojini Babar: Publication of a book on work, research and writing at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.