भुदरगड तालुक्यातील २९ गावांत सरपंच निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:33 AM2021-02-27T04:33:21+5:302021-02-27T04:33:21+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यात आज पार पडलेल्या २९ गावांतील सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या. या निवडीमध्ये तब्बल १६ महिला ...
गारगोटी : भुदरगड तालुक्यात आज पार पडलेल्या २९ गावांतील सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या. या निवडीमध्ये तब्बल १६ महिला सरपंच कारभार करणार आहेत तर एकूण ४३ ग्रा.पं.मध्ये २८ महिला सरपंच नियुक्त झाल्या आहेत.
दोनवडे येथे आघाडीकडून निवडून आलेल्या माधुरी सूरज कांबळे यांनी शिवसेनेच्या आमदारा आबिटकर गटातील सदस्यांचे पाठबळ मिळवून आयत्यावेळी सरपंच झाल्याने चार संख्याबळ असणाऱ्या आघाडीला नेत्यांना ऐनवेळी सत्ता स्थापन करता आली नाही.
पाचर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी अर्ज माघारी दिवशीच बिनविरोध करून शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. फणसवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव हे आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गावागावांत स्थानिक आघाड्यांचे प्राबल्य राहिले आहे. या निवडीत शिवसेनेच्या आमदार आबिटकर गटाचा वरचष्मा राहिला आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे.
गावनिहाय सरपंच उपसरपंच असे १) दोनवडे : सरपंच माधुरी सूरज कांबळे, उपसरपंच नंदा प्रकाश पाटील २) पाचर्डे : सरपंच शोभा प्रकाश पाटील, उपसरपंच नामदेव पाटील, ३) ////// : सरपंच गीता नंदकुमार सावंत, उपसरपंच अतुल सावंत ४)डेळे : सरपंच मनीषा अर्जुन भारमल, उपसरपंच राजनंदा पोवार ५) नवरसवाडी : सरपंच सुनीता ज्ञानदेव देवळे, उपसरपंच धोंडिराम पाटील ६) नितवडे : सरपंच वैशाली जयवंत कांबळे, उपसरपंच हैबती पाटील ७) पंडिवरे : सरपंच रुपाली विजय रामाणे, उपसरपंच इंदुबाई कांबळे ८) नाधवडे : सरपंच गीता संभाजीराव पाटील, उपसरपंच विठ्ठल पाटील ९) बेडीव : सरपंच नमिता चंद्रकांत गुरव, उपसरपंच वसंत कांबळे १०) भालेकरवाडी : सरपंच मनीषा बाळासोा भालेकर, उपसरपंच कृष्णात चौगले ११) म्हासरंग : सरपंच आम्रपाली सखाराम कांबळे, उपसरपंच उत्तम धुरी १२) वासणोली : सरपंच नंदा मानसिंग पाटील, उपसरपंच विद्या येडगे १३) शिवडाव : सरपंच प्रणाली प्रकाश तवडे, उपसरपंच सात्ताप्पा कांबळे १४) लोटेवाडी : सरपंच सुनीता सात्तापा परीट, उपसरपंच तानाजी साठे १५) नांदोली : सरपंच माधुरी महादेव पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील १६) सालपेवाडी : सरपंच काजल संग्राम शिंदे, उपसरपंच अमोल झोरे १७) फणसवाडी : सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच प्रियांका निंबाळकर
१८) खेडगे-एरंडपे : सरपंच सूरज पाटील, उपसरपंच राजनंदा पोवार १९)नांगरगाव : सरपंच अमोल साळोखे, उपसरपंच वैजयंती पाटील २०) पाटगाव : सरपंच विलास देसाई, उपसरपंच महेश पिळणकर २१) बारवे : सरपंच योगेश पाटील, उपसरपंच मनीषा देसाई २२) बसरेवाडी : सरपंच संदीप पाटील, उपसरपंच रवींद्र देवेकर २३) आंबवणे : सरपंच रोहित जोशी, उपसरपंच सुजाता चव्हाण २४)पांगिरे : सरपंच सर्जेराव पाटील, उपसरपंच सरिता साळोखे २५)बामणे : सरपंच बाळासोा धोंडिराम जाधव, उपसरपंच सुनीता इंगळे २६) पाळ्याचा हुडा : सरपंच प्रकाश हजाम, उपसरपंच जयवंत तेजम २७) पळशिवणे : सरपंच विजय पवार, उपसरपंच अर्चना कुराडे २८) मोरेवाडी : सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच धनाजी मोरे २९) म्हसवे : सरपंच सर्जेराव देसाई, उपसरपंच शेवंता सांडुगडे