सरपंच, ग्रामसेवकांवर लवकरच कारवाई ?

By Admin | Published: March 2, 2016 01:10 AM2016-03-02T01:10:23+5:302016-03-02T01:26:44+5:30

आमजाई व्हरवडेतील पेयजल अपहार : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लक्ष

Sarpanch, Gramsevak act soon? | सरपंच, ग्रामसेवकांवर लवकरच कारवाई ?

सरपंच, ग्रामसेवकांवर लवकरच कारवाई ?

googlenewsNext

सुनील चौगले-- आमजाई व्हरवडे आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित पाचजणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई का करू नये याबाबत गेल्या आठवड्यात नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले होते.
मात्र, समाधानकारक खुलासा नसल्याचा अहवाल राधानगरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार दोन दिवसांत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याने सर्व तालुक्याच्या कारवाईकडे नजरा लागल्या आहेत.
आमजाई व्हरवडे येथे ४९ लाख रुपयांच्या पेयजल योजनेत साडेचार लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वीच संबंधित पाचजणांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तक्रारदार गावकऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी सुभेदार यांच्याकडे केली. या दोघांवर कारवाई झाली नाही, तर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे सुभेदार यांनी या दोघांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गेल्याच आठवड्यात या दोघांना नोटीस बजावून सरपंचांना अपात्र करून फौजदारी का करू नये, तर ग्रामसेविकेला निलंबित करून त्यांच्यावरही फौजदारी का करू नये, अशी नोटीस बजावून पाच दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीत हे दोघेही दोषीच असल्याचे प्रत्यक्षदर्शी स्पष्ट होत असल्याने खुलासा काय देणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले होते. गट विकास अधिकारी यांच्याकडे या दोघांनी खुलासा दिला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याचा अहवाल मंगळवारी गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारणारच असल्याने संपूर्ण तालुक्याचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. घुले यांच्याशी संपर्क साधला असता सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांनी मंगळवारी आमच्याकडे अहवाल दिला असून, या अहवालात समाधानकारक खुलासा नसल्याचे स्पष्ट आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी यांच्याकडे सोपविला जाणार असून, कारवाईबाबत तेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sarpanch, Gramsevak act soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.