सदस्यांना विश्वासात न घेता सरपंचांनी केली डेटा ऑपरेटरची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:19+5:302021-09-14T04:27:19+5:30

कबनूर : डेटा ऑपरेटरची नेमणूक करताना येथील सरपंचांनी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर नेमणूक करून आपला मनमानी कारभार चालवला ...

Sarpanch recommends data operator without trusting members | सदस्यांना विश्वासात न घेता सरपंचांनी केली डेटा ऑपरेटरची शिफारस

सदस्यांना विश्वासात न घेता सरपंचांनी केली डेटा ऑपरेटरची शिफारस

Next

कबनूर : डेटा ऑपरेटरची नेमणूक करताना येथील सरपंचांनी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर नेमणूक करून आपला मनमानी कारभार चालवला आहे, अशी तक्रार आठ सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्याची असल्यास सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ती करावी अथवा डेटा ऑपरेटरची आवश्यकता नाही असे शासनास कळवावे, असे मागील मासिक बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव करून प्रोसिडिंग कायम करण्यात आले. त्यानंतर सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर ऑपरेटरपदाची शिफारस सरपंच शोभा पोवार यांनी केली. याविरोधात ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, मधुकर मणेरे, समीर जमादार, सुनील काडाप्पा, स्वाती काडाप्पा, वैशाली कदम, सुनीता आडके, रजनी गुरव यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत सरपंच पोवार यांना विचारले असता त्या म्हणाल्या, डेटा ऑपरेटरपदाची केलेली शिफारस थांबविलेली आहे. येणाऱ्या बैठकीमध्ये हा विषय ठेवून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

Web Title: Sarpanch recommends data operator without trusting members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.