सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे, सरपंच राहुल शेटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 04:35 PM2023-06-02T16:35:13+5:302023-06-02T16:35:35+5:30

मागणीच्या निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली आहे

Sarpanch to get Special Executive Officer post, Sarpanch Rahul Shete demands to Chief Minister | सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे, सरपंच राहुल शेटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे, सरपंच राहुल शेटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

हेरले: सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे यासाठी हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करुन यामागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे पाठवून मागणी करण्यात आली आहे. हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. सदर मागणीच्या निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली आहे.

ग्रामपंचायत हेरलेने विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणेसाठी केलेला ठराव पुढील प्रमाणे आहे. मासिक सभा क्र.२ दिनांक २४/०५/२०२३ ठराव क्रमांक ०७ चा करणा पुरता उतारा. विषय नं.७ सरपंच यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणे बाबत. ठराव नं. ७ गावातील नागरिकांना शासकीय निमशासकीय शैक्षणिक व इतर काम योजना करत असत त्यांना त्यांचे कागद पत्रांची खरी प्रत करून घ्यावी लागते. खरी प्रत शिवाय कार्यालयीन कामकाज पूर्ण होत नाही. यामुळे नागरिकांना खरी प्रत घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो व इतरत्र हेलपाटे माराव्या लागतात. 

सरपंच हे लोकनियुक्त असल्याने त्यांना गाव परिचित असते. त्यामुळे त्यांना खरी प्रत करून देण्याचा अधिकार देण्यात यावा. "विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळावे यासाठी या ठरावाने तशी मागणी करण्यात यावी. या ठरावाचे सूचक अमित आदगोंडा पाटील, अनुमोदक सविता बाळगोंडा पाटील असून सर्वानुमते हा ठराव मंजुर करण्यात आला. या ठरावावर सरपंच राहुल शेटे व ग्रामविकास अधिकारी बी.एस. कांबळे यांच्या सहया आहेत.

Web Title: Sarpanch to get Special Executive Officer post, Sarpanch Rahul Shete demands to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.