सरूड परिसराला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:15+5:302021-06-02T04:20:15+5:30
तासभर पडलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी दोनच्या सुमारास ...
तासभर पडलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी दोनच्या सुमारास सरूड परिसरात अचानक वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तासभर हा पाऊस मुसळधार कोसळत होता. या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले पावसाळ्याप्रमाणे तुडुंब वाहू लागले. नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत अनेकांच्या घरात शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेत वाफ्यामध्येही पाणी साचले आहे. भात पेरणी झालेल्या शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर मानला जात आहे, तर परिसरात ज्या पेरण्या राहिल्या आहेत अशा काही क्षेत्रांमधील पेरण्यांचा या पावसामुळे खोळंबा झाला आहे. अशा क्षेत्रातील भात पेरण्या पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहेत.
फोटो ओळी
सरूड परिसरात मंगळवारी दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून असे पाणी वाहत होते.
( छाया : अनिल पाटील , सरुड )