सरूड गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:24 AM2021-04-16T04:24:23+5:302021-04-16T04:24:23+5:30
सरूड येथे वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे शाहूवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी सरुड गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे ...
सरूड येथे वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे शाहूवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी सरुड गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे .
१ एप्रिलपासून आजअखेर गावात १३ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर एक महिला व एक पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ११ रुग्णांवर विविध दवाखान्यांत उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस गावात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी सरूड गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याचा आदेश काढला आहे.
आजअखेर शाहूवाडी तालुक्यातील २३ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये वालूर, अमेणी, उचत, गोंडोली, सुपात्रे, केर्ले, ऐनवाडी, चरण, गजापूर, शिराळे वारुण, शिंपे, भैरेवाडी, मलकापूर, बांबवडे, गोगवे, शित्तूर वारुण, सरुड, जुळेवाडी, कोतोली, गाडेवाडी, धनगरवाडी, करूंगळे, जांबुर आदी गावांचा समावेश आहे.