सरवडेच्या विठ्ठलाई पतसंस्थेला ४० लाख २३ हजारांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:35+5:302021-04-16T04:25:35+5:30
सरवडे : येथील विठ्ठलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ४० लाख २३ हजार इतका नफा झाला असल्याची ...
सरवडे : येथील विठ्ठलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ४० लाख २३ हजार इतका नफा झाला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती संगीता रवींद्र रानमाळे यांनी दिली.
सरवडे येथील संस्थेच्या सभागृहात या आर्थिक वर्षात संस्थेच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा देताना त्या म्हणाल्या, संस्थेने या आर्थिक वर्षात ५० कोटी ४७ लाख इतकी आर्थिक उलाढाल केली असून, १५ कोटी ५ लाख इतक्या ठेवी जमा केल्या आहेत. सभासदांचा विश्वास व पारदर्शक कारभार यामुळे संस्था प्रगतीच्या शिखरावर आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच संस्था काही वर्षांतच सुवर्णवर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेची गुंतवणूक ७ कोटी ७२ लाख असून, भागभांडवल ३१ लाख ८५ हजार इतकी आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मंदा आणाजेकर, संचालक रघुनाथ गुरव, विष्णुपंत पाटील, दामोदर वागवेकर, आप्पासो कोतमिरे, शंकरराव फराकटे, बळवंत रानमाळे, पांडुरंग पाटील, रामचंद्र पाटील, हेमंत कोतमिरे, संभाजी मोरे उपस्थित होते. मॅनेजर कृष्णात येटाळे यांनी आभार मानले.
.......
फोटो
श्रीमती संगीता रवींद्र रानमाळे