सातारा : दहा दिवसांपासून थंडीचा मुक्काम, साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत स्थिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:37 PM2018-01-28T15:37:36+5:302018-01-28T15:41:46+5:30

गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यातील किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान अजूनही ३० च्या आसपास आहे. सध्या पहाटे व सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे.

Satara: The cold stay of 10 days, the minimum temperature in Satara has been reduced to 12 degrees | सातारा : दहा दिवसांपासून थंडीचा मुक्काम, साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत स्थिरावले

सातारा : दहा दिवसांपासून थंडीचा मुक्काम, साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत स्थिरावले

Next
ठळक मुद्देदहा दिवसांपासून थंडीचा मुक्कामसाताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत स्थिरावले

सातारा : गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यातील किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान अजूनही ३० च्या आसपास आहे. सध्या पहाटे व सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे.


गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून थंडीस सुरुवात झाली. २९ डिसेंबर रोजी दोन वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ९.०४ अंश तापमानाची नोंद साताऱ्यात झाली होती. तर डिसेंबर अखेर व जानेवारी महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत साताऱ्यातील किमान तापमान सरासरी ११ ते १३ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. तर दुसरीकडे दुपारच्या सुमारास ऊन वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूलही जाणवत होती. मात्र, मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी झाले.

किमान तापमान वाढून १६ ते १९ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. तर कमाल तापमानाने ३० अंशाचा टप्पा पार केला होता. असे असतानाच आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली आले आहे.

दि. २५ जानेवारी रोजी किमान तापमान ११.०९ होते तर कमाल तापमान २९.०५ होते. दि. २६ रोजी किमान ११ तर कमाल २९.०६, दि. २७ रोजी १०.०९ आणि ३१ तर दि. २८ रोजी किमान तापमान १२.०४ होते.

२० जानेवारी १२.०२ ३०.०८
२१ जानेवारी ११.०५ ३०.०७
२२ जानेवारी ११.०४ ३०.०४
२३ जानेवारी १२.०७ ३०.०५
२४ जानेवारी ११.०८ २९.०६
२५ जानेवारी ११.०९ २९.०५
२६ जानेवारी ११.०० २९.०६
२७ जानेवारी १०.०९ ३१.००
२८ जानेवारी १२.०४ ...

 

Web Title: Satara: The cold stay of 10 days, the minimum temperature in Satara has been reduced to 12 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.