सातारा आवृत्तीसाठी.... संधिवात तपासणीसाठी उद्या तज्ज्ञ डाॅक्टर साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:01+5:302020-12-17T04:49:01+5:30
सातारा : संधिवात तपासणी शिबिरासाठी उद्या, शुक्रवारी साताऱ्यातील साई अमृत हाॅस्पिटल, खुटाळे रोड, बुधवार पेठ; तर विसावा नाका ...
सातारा : संधिवात तपासणी शिबिरासाठी उद्या, शुक्रवारी साताऱ्यातील साई अमृत हाॅस्पिटल, खुटाळे रोड, बुधवार पेठ; तर विसावा नाका येथील वेदांत हाॅस्पिटलमध्ये पुण्याचे तज्ज्ञ डाॅक्टर अभिषेक झंवर उपस्थित राहणार आहेत.
संधिवात हा केवळ सांध्यांचा रोग नाही तर हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड आणि डोळे यांसारख्या इतर अवयवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यावर निदान आणि उपचार लवकर झाले नाहीत तर कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका आहे. सांधेदुखीकडे दुर्लक्ष करणे, उपचारांसाठी डाॅक्टरांकडे न जाण्याने या सर्व गोष्टींना निमंत्रित केले जाऊ शकते. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, सहा महिन्यांच्या आत या आजाराची लक्षणे ओळखून, योग्य उपचार घेऊन रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. या रोगावर रामबाण इलाजासाठी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.