साताऱ्याच्या सहायक भांडारपालास अटक

By admin | Published: February 1, 2017 11:13 PM2017-02-01T23:13:20+5:302017-02-01T23:13:20+5:30

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरण

Satara's assistant storehouse arrested | साताऱ्याच्या सहायक भांडारपालास अटक

साताऱ्याच्या सहायक भांडारपालास अटक

Next



कोल्हापूर : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून पंधरा लाखांचा गंडा घालणाऱ्या सहायक भांडारपालला बुधवारी करवीर पोलिसांनी अटक केली. संशयित संपत तुकाराम सणस (वय ४०, रा. केंजळ, ता. जावळी, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग (सातारा) येथे कार्यरत होता.
कृष्णात भीमराव कोरवी (५१, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) यांच्या दोन मुलांना मेहुणा श्रीकांत गजरे याने संशयित सदाशिव कोरवी, मकबूल नदाफ व संपत सणस यांच्या मदतीने शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी कोरवी यांनी २४ आॅक्टोबर २०१६ ला करवीर पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी सदाशिव कोरवी व श्रीकांत गजरे यांना अटक केली. मकबूल नदाफ व संपत सणस हे फरार होते. या दोघांचाही उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला. या प्रकरणी तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Satara's assistant storehouse arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.