सतेज, तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विचारणा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:56+5:302021-09-19T04:25:56+5:30

कोल्हापूर : सतेज पाटील तुमचे वय ५० असेल, तर तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..काँग्रेसने तुम्हाला कॅबिनेट मंत्री का केले नाही, ...

Satej, how are you still the Minister of State ..? Deputy Chief Minister Ajit Pawar's question: | सतेज, तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विचारणा :

सतेज, तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विचारणा :

Next

कोल्हापूर : सतेज पाटील तुमचे वय ५० असेल, तर तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..काँग्रेसने तुम्हाला कॅबिनेट मंत्री का केले नाही, अशी थेट विचारणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील कार्यक्रमात केली. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील ज्ञानशांती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते झाले.

या कार्यक्रमात एरव्ही जशी टोलेबाजी करतात तशीच टोलेबाजी पवार यांनी केली.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राज्यमंत्री म्हणून करत असलेल्या कामाची दखल घेऊन ते म्हणाले, सतेज, तुमचे वय ५० असेल, तर तुम्हाला काँग्रेसने अजून कॅबिनेट मंत्री का केले नाही..? शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीतील माझ्यासह जयंत पाटील व अन्य नेत्यांना पंचेचाळीसाव्या वर्षीच ही संधी दिली. कॅबिनेट मंत्री असाल तर धडाडीने काही निर्णय घेता .येतात. त्याच धडाडीने ते राबवताही येतात. त्यामुळे ही संधी तुम्हाला आतापर्यंत मिळायला हवी होती. काँग्रेस तुम्हाला अजून किती वर्षे राज्यमंत्रीच ठेवणार आहे, अशी विचारणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली. पवार यांच्या या टोलेबाजीची कोल्हापूर जिल्ह्यातील सोशल मीडियावर शनिवारी दिवसभर चर्चा उसळली.

Web Title: Satej, how are you still the Minister of State ..? Deputy Chief Minister Ajit Pawar's question:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.