सतेज-मुश्रीफ विरुद्ध पीएन-महाडिक असेच कुस्तीगोकुळचे रणांगण : बिनविरोधची सुतराम शक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:11+5:302021-03-13T04:45:11+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महाविकास आघाडीत संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ...

Satej-Mushrif vs PN-Mahadik wrestling battle: Sutram unlikely without opposition | सतेज-मुश्रीफ विरुद्ध पीएन-महाडिक असेच कुस्तीगोकुळचे रणांगण : बिनविरोधची सुतराम शक्यता नाही

सतेज-मुश्रीफ विरुद्ध पीएन-महाडिक असेच कुस्तीगोकुळचे रणांगण : बिनविरोधची सुतराम शक्यता नाही

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महाविकास आघाडीत संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले असले तरी ही निवडणूक पालकमंत्री सतेज पाटील व मुश्रीफ विरुद्ध आ. पी.एन. पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यामध्येच होणार आहे. हे गृहीत धरूनच राजकीय मोर्चेबांधणी केली जात आहे. वरकरणी सध्या सुरू असलेली चर्चा, बैठका म्हणजे दोन्ही बाजूंकडून अंदाज घेण्याचा प्रकार असून त्यातून निष्पन्न काही होणार नाही.

निवडणूक बिनविरोध होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण दोन्ही बाजूंकडून इच्छुकांची मोठी संख्या आहे. कुणाला थांबवायचे, हा मोठा पेच आहे. गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला; परंतु राष्ट्रवादीला राखीव गटातील एकच जागा मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची मते मिळाली नसल्याचे सत्तारूढ गटाला आजही वाटते. कोणत्याही स्थितीत पी. एन. हे महाडिक यांना सोडणार नाहीत आणि सतेज पाटील यांना महाडिक चालणार नाहीत. कमी जागा घेऊन सत्तारूढ आघाडीसोबत जाण्यापेक्षा सतेज पाटील यांच्यासोबत जाण्यात जास्त फायदा असल्याचे राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीला वाटते. जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांची पालकमंत्र्यांंशी गट्टी आहे. त्यामुळे त्यांना सोडून ते महाडिक यांच्यासोबत जातील ही शक्यता नाही. सतेज-मुश्रीफ यांची एकी व त्याला काही ज्येष्ठ संचालकांचे पाठबळ मिळाले तर निवडणुकीत ते हवा निर्माण करू शकतात, असे सध्याचे चित्र आहे.

Web Title: Satej-Mushrif vs PN-Mahadik wrestling battle: Sutram unlikely without opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.