कोल्हापुरात सतेज पाटीलांनी आणल्या ए.सी. बस, महाडिक आणणार इलेक्ट्रिक बस
By समीर देशपांडे | Updated: September 26, 2023 18:55 IST2023-09-26T18:53:24+5:302023-09-26T18:55:00+5:30
कोल्हापूर : शहरात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी नऊ ए.सी. बस आणल्या तर ...

कोल्हापुरात सतेज पाटीलांनी आणल्या ए.सी. बस, महाडिक आणणार इलेक्ट्रिक बस
कोल्हापूर: शहरात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी नऊ ए.सी. बस आणल्या तर आता खासदार धनंजय महाडिक हे १०० इलेक्ट्रिक बसेस आता कोल्हापूरमध्ये आणणार आहेत.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनीच ही बाब सांगितली. यावेळी विविध मते व्यक्त करताना त्यांनी शरद पवार हे उर्जावान नेते असल्याचे प्रशंसोद्गारही काढले. महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत असताना त्यांनी आज बोलताना मात्र कोणताही वाद होणार नाही अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले.
ते म्हणाले, कोल्हापूरची थेट पाईपलाईन पूर्ण झाली तर आम्ही त्यांचे अभिनंदनच करू. ती कधी पूर्ण होणार आहे हे माहिती नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनीच खुलासा केल्यानंतर आता तुम्हीही ते कोल्हापूरला आल्यानंतर हा प्रश्न विचारू नये अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली.