सतेज पाटील सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे संपर्कमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:45 AM2020-02-13T00:45:06+5:302020-02-13T00:45:10+5:30
कोल्हापूर : गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ...
कोल्हापूर : गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ज्या जिल्ह्यांत कॉँग्रेसचे मंत्री नाहीत, तिथे संपर्कमंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तिन्ही पक्षांचे सरकार असल्याने मंत्रिपदांचे वाटप करताना पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागली. सत्तेच्या वाटपात शिवसेना व राष्टÑवादी कॉँॅग्रेसला प्रत्येकी १५, तर कॉँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळाली. तसेच ११ पालकमंत्रिपदे त्यांना मिळाली. मंत्रिपदांची संख्या आणि इच्छुक यांची सांगड घालताना कॉँग्रेसच्या नेतृत्वाची दमछाक उडाली. मंत्रिपदाच्या वाटपात अनेक जिल्हे मंत्रिपदाविनाच राहिले. सुमारे २० जिल्ह्यांत कॉँग्रेसचा मंत्रीच नाही. तेथील कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी, त्यांच्याशी संवाद कायम राहावा, यासाठी संपर्कमंत्र्यांवर जबाबदारी सोपविली आहे.
सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरीची, तर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.