सतेज पाटील यांनी बुडवला १० कोटींचा घरफाळा : धनंजय महाडिक यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:00 IST2021-03-06T17:57:49+5:302021-03-06T18:00:49+5:30
Dhananjay Bhimrao Mahadik Satej Gyanadeo Patil kolhapur -पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी १० कोटी रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी हा घातलेला दरोडा असून याबाबत महापालिका प्रशासनाने जर आठ दिवसात कारवाई केली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिला.

सतेज पाटील यांनी बुडवला १० कोटींचा घरफाळा : धनंजय महाडिक यांचा आरोप
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी १० कोटी रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी हा घातलेला दरोडा असून याबाबत महापालिका प्रशासनाने जर आठ दिवसात कारवाई केली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिला.
महाडिक यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची कागदपत्रे सादर केली. परंतू दहा कोटींचा आरोप मात्र तोंडी केला. यावेळी माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, राजसिंह शेळके यावेळी उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, संजय डी. पाटील, सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे चौघेजण या कंपनीचे भागीदार आहेत. त्यांनी या इमारतीमधील ३० मिळकती व्यावसायिक भाड्याने दिल्या आहेत. मात्र महापालिकेकडे आपण खुद वापर करत असल्याची नोंद केली आहे. जर एखादी मिळकत व्यावसायिक कारणासाठी भाड्याने दिली असेल तर त्याचा घरफाळा तिप्पट होतो. परंतू खुद म्हणून नोंद करत महापालिकेची १० कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. मिळकतीची मापेही चुकीची दाखवण्यात आली आहेत.
अन्य एक उदारहरण देताना महाडिक म्हणाले, ड्रीम वर्ल्ड अम्युजमेंट पार्क या मिळकतीचा सन १९९७ पासूनचा ९१ लाख ६३ लाख रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. केवळ सत्तेच्या माध्यमातून गैरफायदा घेण्याासाठी त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे.