सॅटेलाईट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Published: November 13, 2015 11:05 PM2015-11-13T23:05:40+5:302015-11-13T23:49:44+5:30

विश्वास पाटील : उदगांव येथे गोकुळ दूध संघाच्या दुध प्रकल्पाचे उद्घाटन

Satelite Project A Boogie for Farmers | सॅटेलाईट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान

सॅटेलाईट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान

Next

जयसिंगपूर : ग्रामीण भागामध्ये गोकुळची सॅटेलाईल डेअरी ही ग्रामीण भागाचे महत्व वाढविणारी आसुन येथे एक लाख वीस हजार दुधाची प्रक्रिया होणारे प्रकल्प आहे. मुख्य शाखेनंतर उदगांव येथे प्रथमच सॅटेलाईल दुध डेअरी झाली असून ती शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. तसेच संघाचे अर्थिक बचत करणारे आहे असे प्रतिपादन गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
उदगांव (ता शिरोळ) येथे गोकुळ संघाची सॅटेलाईल डेअरीचे उद्घॉटन विश्वास पाटील व सौ. उर्मिला पाटील आणि विश्वास जाधव व सौ.उषादेवी जाधव यांच्या हस्ते विधीवत पूजाकरून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे महाव्यस्थापक आर.सी.शहा म्हणाले, येथे ४० हजार लिटर दुध पॅकींग होणार आहे. गोकुळ संघाचा हा पहिलाच सॅटेलाईट असून येथून चिलींग प्रोसेसिंग व पॅकिंग होणार आहे व येथून मुंबई वाशी शाखेला एक ते दिड लाख दुध पुरवठा केला जाणार आहे. यामुळे गोकुळ संघाचा ताण कमी होणार आहे.
या प्रकल्पात राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडून १२ कोटी ५० लाखाचा आर्थिक अनुदान प्राप्त होत आहे. तर गोकुळ संघाकडून १३ कोटी ५० लाख रूपये असे एकूण २६ कोटीचे काम पूर्ण झाले आहे. येथे शिरोळ तालुक्यातून ५४ हजार ९००, सांगलीतून ३५६००, कर्नाटक १६०००, बल्क मिल्क कुलर १४२०० असे एकूण १ लाख २० हजार ७०० लिटर दूध येथे दररोज पुरवठा होते. तर गाईच्या टोन दुध सुधारणाकरण सुविधा उपलब्ध असल्याने ही एक महत्वाची योजना ठरली असून जानेवारी २०१६ मध्ये प्रात्यक्षिक घेवून प्रत्यक्ष दुध संकलनास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, रामराजे कुपेकर, सत्यजित पाटील, विलास कांबळे, रविंद्र आपटे, अमरिश घाटगे, बाबा देसाई, राजेश पाटील, अरूण नरके व कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, सुनिल पाटोळे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Satelite Project A Boogie for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.