जनतेला दिलेला वचननामा पूर्ण केल्याचे समाधान - सदाशिव खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:24+5:302021-02-25T04:29:24+5:30

सांगरूळ : ग्रामपंचायत निवडणुकीवेळी वचननाम्याच्या निमित्ताने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आपण यशस्वी ठरलो असून, गावातील सर्वच विकास कामे ...

Satisfaction of fulfilling the promise given to the people - Sadashiv Khade | जनतेला दिलेला वचननामा पूर्ण केल्याचे समाधान - सदाशिव खाडे

जनतेला दिलेला वचननामा पूर्ण केल्याचे समाधान - सदाशिव खाडे

Next

सांगरूळ : ग्रामपंचायत निवडणुकीवेळी वचननाम्याच्या निमित्ताने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आपण यशस्वी ठरलो असून, गावातील सर्वच विकास कामे सध्या अंतिम टप्प्यात असून, सांगरुळच्या जनतेने टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवणार आहे, असे प्रतिपादन सांगरुळचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी केले.

सांगरूळ (ता. करवीर) येथे नवीन पाईपलाईन कामाच्या प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे होते.

कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर म्हणाले, राजकारणविरहित सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ग्रामपंचायतीचे काम सुरू आहे. निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेला दिलेले शब्द विकास कामांच्या रूपाने पूर्ण केल्याचे समाधान आहे.

माजी सरपंच शशिकांत म्हेत्तर म्हणाले, सरपंच सदाशिव खाडे यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेत गावचा सर्वांगीण विकास केल्याने चार वर्षांत कोट्यवधीची कामे करू शकलो.

यावेळी यशवंत बँकेचे माजी उपाध्यक्ष दिलीप खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे, सर्जेराव यादव, आनंदा इंगळे, दत्तात्रय सुतार, ज्ञानदेव खाडे, सर्जेराव मगदूम, शुभम खाडे, सागर नाळे, उत्तम खाडे, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग बिडकर उपस्थित होते.

फोटो ओळी : सांगरूळ (ता. करवीर) येथे पाईपलाईन कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कृष्णात खाडे, सर्जेराव मगदूम, सुशांत नाळे, सदाशिव खाडे, दिलीप खाडे, शशिकांत म्हेत्तर, निवास वातकर आदी उपस्थित होते. (फोटो-२४०२२०२१-कोल-सांगरूळ)

Web Title: Satisfaction of fulfilling the promise given to the people - Sadashiv Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.