बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट समीर सावला यांचे शनिवारी वर्कशॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:44 AM2019-09-25T00:44:50+5:302019-09-25T00:47:43+5:30

ब्युटिशियननी आपल्या मॉडेलसह या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.ब्युटिशियननी आपली ब्राईड व ग्रूमना त्याच ठिकाणी तयार करायचे आहे. साडी किंवा जो पोशाख असेल तो घरून करून आणायचा आहे. मेकअप, हेअरस्टाईल स्पर्धेच्या ठिकाणी करायची आहे.

Saturday workshop by Bollywood makeup artist Samir Sawla | बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट समीर सावला यांचे शनिवारी वर्कशॉप

बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट समीर सावला यांचे शनिवारी वर्कशॉप

Next
ठळक मुद्देलोकमत ‘सखी मंच’ ब्राईड अ‍ॅँड ग्रूम कॉँटेस्ट : जिंका रुपये ३१ हजारांची रोख पारितोषिके

कोल्हापूर : आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते आणि लग्न हा तर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. यासाठी आपले ब्युटिशियन खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच लोकमत ‘सखी मंच’ने ब्राईड आणि ग्रूम मेकअप वर्कशॉप आणि कॉँटेस्ट आयोजित केली आहे. हा कार्यक्रम शनिवारी
(दि. २८ ) मेघमल्हार हॉल, हॉटेल सयाजी येथे होणार आहे.

कार्यक्रम दोन सेशनमध्ये होणार असून, सकाळी अकरा ते दोन या वेळेत ब्युटिशियनसाठी प्रख्यात ब्रायडल आणि प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट समीर सावला, मुंबई यांचा मेकअप वर्कशॉप होणार आहे. यामध्ये ब्राईड आणि ग्रूमच्या मेकअपमधील नव्या ट्रेंड्ससह हेअर स्टाईल, ब्युटिशियनना टिप्सही मिळणार आहेत. वर्कशॉपला १००० रुपये शुल्क असून, हॉटेल सयाजी येथे लंच व ‘हाय टी’ची सोय केली जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता याच ठिकाणी ब्युटिशियनसाठी ब्युटिफुल ब्राईड आणि हॅँडसम ग्रूम ही स्पर्धा घेतली जाईल. ब्युटिशियननी आपल्या मॉडेलसह या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.

ब्युटिशियननी आपली ब्राईड व ग्रूमना त्याच ठिकाणी तयार करायचे आहे. साडी किंवा जो पोशाख असेल तो घरून करून आणायचा आहे. मेकअप, हेअरस्टाईल स्पर्धेच्या ठिकाणी करायची आहे. यासाठी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३०असा दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. समीर सावला, सौंदर्यविश्वातील मान्यवर स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. या स्पर्धेसाठी ४९० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विजेत्यांना ब्राईडमध्ये २१ हजारांची, ग्रूममध्ये १० हजारांची रोख बक्षिसे, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वर्कशॉप व कॉँटेस्टमधील सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल.

कार्यक्रमासाठी संकल्प, दौलत देसाई मित्रपरिवार, सिटी कॉस्मेटिक लेसर हेअर ट्रान्स्प्लांट सेंटर, श्री ज्वेल पॅलेस, अग्रवाल डिझायनर हब, जोस कॉस्मेटिक लॉँज, अनिता रिटेल (एसबेडा), ज्यूस ब्युटी यांचे सहकार्य लाभले आहे. हॉटेल सयाजी हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.

सायंकाळी सहा वाजता स्पर्धेमधील सहभागी झालेल्या ब्राईड आणि ग्रूमचा ग्लॅमरस रॅम्पवॉक, सहस्रम बॅँडसोबत म्युझिकल इव्हनिंगचा रंगारंग इव्हेंट होणार आहे आणि समीर सावला यांच्याकडून सखी सदस्यांना स्टायलिंग, ग्रूमिंगच्या टिप्स मिळणार आहेत. सखी सभासदांना मोफत प्रवेश असून कार्यक्रमाचे पासेस ‘लोकमत’च्या कार्यालयात उपलब्ध आहेत. ब्युटिशियनसाठी वर्कशॉप आणि कॉँटेस्टसाठीची पूर्व नावनोंदणी लोकमत कार्यालयात स. १० ते सायं. ६ या वेळेत सुरू राहील. अधिक माहितीसाठी ९१६८९२४०२२, ९८३४५०८८३७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

‘ब्युटिशियन आॅफ द इअर’ कोण ठरणार ?
कोल्हापुरात सलग दुसऱ्या वर्षी ‘ब्युटिशियन आॅफ द इअर’ ही मानाची ट्रॉफी दिली जाणार आहे. समीर सावला यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी ‘ब्युटिफुल ब्राईड’ आणि ‘हँडसम ग्रूम’ या दोन्ही विभागांत ही ट्रॉफी दिली जाणार आहे .

आनंदी जीवनासाठी ‘संकल्प’
सध्याच्या युगात अनेक नवनवीन आजार डोके वर काढत आहेत. या सगळ्यांसाठी आपण तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. यासाठी आपला आहार, विहार व विचार योग्य असणे आवश्यक आहे. ‘संकल्प’ घेऊन आले आहेत, मुळात आजार होऊच नयेत यासाठीची औषधे. ज्यांच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढून आजार दूर होतात.

निरामय सौंदर्यासाठी शास्त्रशुद्ध उपचार
सध्याच्या युगात प्रत्येकाला सुंदर दिसणे गरजेचे असते; पण सौंदर्य हे फक्त बाह्य उपचारांवर अवलंबून नसते. त्यासाठी मुळापासून आणि शास्त्रशुद्ध उपचार आवश्यक असतात. हे सर्व उपचार राजारामपुरी आठवी गल्लीमधील सिटी कॉस्मेटिक, लेसर, हेअर ट्रान्स्प्लांट सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.

श्री ज्वेल्स पॅलेस : अत्याधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांच्या भव्य रेंजसह श्री ज्वेल्स ग्राहकांच्या सेवेत सज्ज आहे. भाऊसिंगजी रोडवर गुजरीमध्ये श्री ज्वेल्सची भव्य वास्तू आहे. ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजनासुद्धा येथे राबविल्या जातात.
नववधंूचे पसंतीचे दालन
लग्नसराई म्हटले की, नववधूंसाठी खरेदी ही महत्त्वाची असते. याकरिता राजारामपुरी, सातव्या गल्लीतील वसंत प्लाझा येथील अग्रवाल डिझायनर हब येथे लेहंगा, सिल्क सारीज, ड्रेसेस यांची भव्य रेंज उपलब्ध आहे.


प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट समीर सावला
समीर सावला हे ब्रायडल आणि प्रोस्थेटिक मेकअप स्पेशालिस्ट आहेत. आजपर्यंत त्यांनी १००० हून अधिक ब्रायडल मेकअप केले आहेत. मुंबईमध्ये घाटकोपर आणि बोरिवली येथे ते सरकारमान्य दोन इन्स्टिट्यूट चालवितात. संपूर्ण भारतात त्यांनी दीडशेहून अधिक सेमिनार आणि वर्कशॉप घेतले आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. गेली आठ वर्षे ते या क्षेत्रात काम करीत आहेत.


शनिवार, २८ सप्टेंबर । वर्कशॉप : सकाळी १० वा. । कॉँटेस्ट : दुपारी ३.०० वा.। स्थळ : मेघमल्हार हॉल, हॉटेल सयाजी, कोल्हापूर.

Web Title: Saturday workshop by Bollywood makeup artist Samir Sawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.