‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

By admin | Published: October 28, 2015 11:50 PM2015-10-28T23:50:00+5:302015-10-29T00:08:11+5:30

प्रत्येक आमदार घेणार तीन गावे दत्तक : पायाभूत सुविधा, खेडेगावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी योजना

Saturday's deadline for 'idealgram' selection | ‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

Next

प्रकाश पाटील -- कोपार्डे--राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या गावाची निवड करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व आमदारांना आॅक्टोबरअखेर अंतिम मुदत दिली आहे. या योजनेसाठी विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांना प्रत्येकी तीन गावे दत्तक घ्यावी लागणार आहेत.
भाजपने सत्तेत आल्यानंतर खेडेगावांचा चेहरा बदलण्यासाठी व पायाभूत सुधारणा करण्यासाठी आमदार आदर्शग्राम योजनेचा संकल्प केला. प्रत्येक आमदारांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत किमान तीन गावांना दत्तक घेण्याचे बंधन घातले आहे. त्यापैकी पहिल्या गावासाठी जुलै २०१७, दुसरे गाव जुलै २०१८, तिसरे गाव जुलै २०१९ पर्यंत आदर्शग्राम म्हणून विकसित करण्याची जबाबदारी आमदारांची राहणार आहे. या संदर्भात ग्राम विकास विभागाने मार्गदर्शक सूचनांचा आदेश जारी केला आहे.
आपल्या मतदारसंघातील कोणत्याही तीन गावांची निवड करावयाचे स्वातंत्र्य आमदारांना देण्यात आले आहे. महात्मा गांधींनी भारत देश हा प्रामुख्याने खेड्यात असून, खेड्याकडे वळा, अशी हाक दिली होती.
महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण आदर्श गाव निर्माण करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. सक्षम आणि पारदर्शी पंचायत, ग्रामस्थांचा स्थानिक सहभाग वाढवून लोकशाहीची मुळे आणखी घट्ट करणे, हा सुद्धा या योजनेचा लाभ आहे.
शहरी मतदारसंघातील सदस्यांना सोईच्या भागातील गावांना प्राधान्य देता येईल, विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, आदींतून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना राज्यातील कोणतेही गाव दत्तक घेण्याची मुभा आहे. संबंधित आमदारांना स्वत:चे अथवा पत्नीचे गाव दत्तक घेता येणार नाही. या योजनेसाठी आतापासून साधारणपणे पावणेचार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या गावाची निवड आॅक्टोबर ३१ अखेर करण्याची मुदत आमदारांना देण्यात आली आहे. पहिले गाव जुलै २०१७ पर्यंत आदर्शग्राम होईल, असे नियोजन आमदारांना करावे लागणार आहे. दुसरे गाव २०१६ मध्ये अंतिम करून जुलै २०१८ पर्यंत विकसित करावयाचे आहे. तर तिसरे गाव २०१७ पर्यंत निश्चित करून जुलै २०१९ पर्यंत ते करावयाचे आहे. या योजनेत गावांची निवड करताना एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गाव निवडावयाचे आहे.

पर्यावरणावर भर : सामाजिक एकोपा वाढवावा लागणार

Web Title: Saturday's deadline for 'idealgram' selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.