चारचाकी वाहन कमी किमतीत विकायचे आहे ; आॅनलाईनद्वारे सव्वादोन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:52 AM2019-11-27T10:52:57+5:302019-11-27T11:53:22+5:30
यांच्याकडून गुगल प्लेद्वारे दोन लाख ३१ हजार ८८० रुपयांची फसवणूक केली. तसेच संबंधितांनी वाहनही दिले नाही. याबाबत विशाल, देवेंद्र सिंग, राकेश, संजना, आदींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर : वस्तूंची आॅनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या एका वेबसाईटवर एमएच-१४-एफ-४७२० हे चारचाकी वाहन कमी किमतीत विकायचे आहे, अशी जाहिरात देऊन सुमारे दोन लाख ३१ हजार ८८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी चौघाजणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद राहुल हिंदुराव काटकर (वय ३५, रा. टोप, ता. हातकणंगले) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वस्तूंची आॅनलाईन खरेदी-विक्री करणा-या एका वेबसाईटवर एमएच-१४-एफ-४७२० हे चारचाकी वाहन कमी किमतीत विकायचे आहे, अशी जाहिरात देऊन मी विशाल आर्मीमध्ये असून मला याबाबतचा कर बसत नाही, त्यामुळे पाच लाख २० हजार या कमी किमतीत हे वाहन विकत आहे, असे सांगून संबंधितांनी ९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत काटकर यांच्याकडून गुगल प्लेद्वारे दोन लाख ३१ हजार ८८० रुपयांची फसवणूक केली. तसेच संबंधितांनी वाहनही दिले नाही. याबाबत विशाल, देवेंद्र सिंग, राकेश, संजना, आदींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- दाम्पत्यास १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या तरुणास अटक
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भाड्याने राहून आई-वडिलांचे नाते असल्याचा विश्वास संपादन करून कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील दाम्पत्याला १५ लाख रुपयांना गंडा घालणाºया तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित विकास हुनाप्पा राठोड (वय २८, रा. लमनतांडा, ता. जत, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले, संशयित विकास राठोड हा मार्च २०१७ ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत फिर्यादी कल्पना दिलीप साळोखे यांचे सरनाईक गल्ली, शिवाजी पेठ येथील घरी भाड्याने राहत होता. त्याने घरामध्ये राहत असताना ओळख वाढवून तुम्ही माझे आई-वडील आहात, असे वारंवार सांगून कल्पना साळोखे यांचा विश्वास संपादन करून नोकरी, शेतजमिनी नावावर करण्यासाठी व लग्नासाठी असे वारंवार १५ लाख रुपये घेऊन गंडा घातला होता. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.