एक झाड वाचविण्यासाठी शासनाला दिली दहा गुंठे जागा...

By Admin | Published: June 4, 2017 10:50 PM2017-06-04T22:50:25+5:302017-06-04T22:50:25+5:30

एक झाड वाचविण्यासाठी शासनाला दिली दहा गुंठे जागा...

To save a tree, the government has given ten gurna ... | एक झाड वाचविण्यासाठी शासनाला दिली दहा गुंठे जागा...

एक झाड वाचविण्यासाठी शासनाला दिली दहा गुंठे जागा...

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गात शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. हे हृदयद्रावक चित्र असतानाच निसर्ग वाचविण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेली माणसंही सातारा जिल्ह्यात आहेत. पाचवड येथील गोरख चिंच वाचविण्यासाठी तेथील शेतकऱ्याने तब्बल दहा गुंठे जागा सरकारला दिली.
वाई तालुक्यातील पाचवडमधून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गालगत पांडुरंग गायकवाड यांची दहा एकर वडिलोपार्जित जागा आहे. त्यांची तीन एकर जागा पुनर्वसनात गेली. त्यामुळे उरलेल्या जागेवर उदरनिर्वाह चालला आहे. त्यांच्या जागेतच एक गोरख चिंच आहे. या झाडाशी त्यांचे अनेक पिढ्यांचे नाते जडले आहे. हे सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे वर्षे जुने असल्याची ग्रामस्थांची धारणा आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मोठी आसामी असलेले विश्वनाथ सदाशिव नातू यांची ही मुळची जागा. ती पुढे गायकवाड यांनी खरेदी केली. या जागेतच रस्त्याच्या एका बाजूला मोठी दगडी जिन्याची विहिर आहे. विहिरीपासून सुमारे वीस फुटांवर हे गोरख चिंचेचे झाड आहे.
गोरख चिंचेचे झाड सहजासहजी उगवत नाही. जिल्ह्यात पाचवड, मेणवली तर पाटण तालुक्यातील आवर्डे असे तीन ठिकाणीच हे झाड आहे. त्याचे बी टाकले तरी झाड उगवत नाही. हा पाचवड ग्रामस्थांचा आजवरचा इतिहास आहे.
या दुर्मिळ झाडावर महामार्गाच्या सहापदरीकरणात कुऱ्हाड चालविली तर मोठा ठेवा हरवून जाईल या भावनेने गायकवाड यांनी हे झाड तोडण्यास विरोध केला. मग हे झाड तोडण्याऐवजी महामार्गाचा सेवा रस्ता झाडाच्या कडेने वळविण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यासाठी जास्त जागा लागणार होती. यासाठी झळ सहन करण्याची तयारी पांडुरंग गायकवाड यांनी ठेवली.
राष्ट्रीय महामार्गाच्या कडेची जमिन ‘सोन्याचं अंडी देणारी कोंबडी’ म्हणून समजली जाते. पण गायकवाड यांनी चिंचेचे झाड जगविण्यासाठी केवळ बारा हजार रुपये गुंठा या दराने देऊन
टाकली.
हे झाड तोडणार असतील तर ते मुळासकट उचलून ते किसन वीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्याचे पुनर्वसन करण्याची तयारी किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदत भोसले यांनीही
व्यक्त केली होती. मात्र गायकवाड यांच्या दातृत्वामुळे ही वेळच आली नाही.

Web Title: To save a tree, the government has given ten gurna ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.