Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 08:09 AM2019-08-11T08:09:26+5:302019-08-11T08:28:32+5:30

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुरातून पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बेंगलोर महामार्गावर

Saved 25 people which flow down in kolhapur flood, fire brigade | Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

Next

एकनाथ पाटील

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुराचे पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावर शिरोली पुलापासून 25 नागरिक आपल्या घराकडे जाण्यासाठी चालत निघाले होते. त्यावेळी, अचानक पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला सावरणं शक्य न झाल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन या 25 जणांचा जीव वाचवला. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही लोकं पुरामुळे अडकून पडली होती.

महामार्गावरुन मार्ग काढत असताना घडलेल्या या अपघातानंतर हे लोक भेदरले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. इस्लामपूरच्या पेठवडगाव परिसरातील हे सर्व नागरिक असून अग्निशमन दलातील जवानांच्यारुपाने त्यांना देवच भेटला. सुनिल वाईगडे, मनिष रणपिसे, मधुकर जाधव, तानाजी वडर, सुनिल यादव अभय कोळी, प्रमोद मोरे अग्निशमन दलातील या जिगरबाज अधिकाऱ्यांनी 25 नागरिकांचा जीव वाचवला.

या नागरिकांचा जीव वाचला. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Saved 25 people which flow down in kolhapur flood, fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.